
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम राहिलेला नाही ही अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आलेली असून एका तरुणाचे एका तरुणीसोबत लग्न जुळले होते मात्र त्याआधीच या तरुणाने तिला घेऊन पलायन केले आहे. बिहारच्या सारण येथील ही घटना असून पळून जाण्याचे कारण त्यांनी जे सांगितले ते देखील तितकेच चमत्कारिक आहे.
उपलब्ध माहितीनुसार, संध्या नावाच्या मुलीचे लग्न अकबरपुर गावातील बोलबम नावाच्या तरुणासोबत जुळले होते. त्यांचा साखरपुडा देखील झाला आणि त्यानंतर त्यांनी एकमेकांशी फोनवर बोलणे सुरू केले त्यातून त्यांच्यात अधिक जवळीक निर्माण झाली आणि आता फार काळ एकमेकांचा विरह सहन होणार नाही यावर दोघांचे देखील एकमत झाले मात्र कुटुंबीयांनी त्यांचे लग्न पुढील वर्षी ठरवले होते मात्र तोपर्यंत धीर धरवत नसल्याने आठ नोव्हेम्बरला दोघेही घरातून पळून गेले.
मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले आपल्या मुलीचे कुणीतरी अपहरण केलेले आहे अशी खबर दिली त्यानंतर दोन डिसेंबर रोजी दोघेही त्यांच्या राहत्या घरी परतले. त्यावेळी घरच्यांनी त्यांना विचारले तेव्हा त्यांनी आम्हाला लवकर लग्न करायचे होते मात्र तुम्ही सतत उशीर करत आहात म्हणून आम्ही पळून गेलो होतो असे कारण सांगितले. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने राम जानकी मंदिर इथे त्यांचा विवाह लावून देण्यात आलेला आहे.