
सोशल मीडियावर सध्या नाशिक येथील एका घटनेची जोरदार चर्चा सुरू असून सिन्नर परिसरात मांजराचा पाठलाग करणारा बिबट्या तिच्यापाठोपाठ विहिरीत कोसळला आणि विहिरीत आपण आता दोघेच आहोत हे लक्षात आल्यानंतर बिबट्याने या मांजराला प्रतिकार करणे सोडून दिले. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून अनेक जणांना ज्या मांजराचा पाठलाग करण्यासाठी बिबट्याने विहिरीत उडी घेतली. ती प्रत्यक्षात आपल्याजवळ आल्यानंतर बिबट्याने तिच्यावर हल्ला का केला नाही ? हा प्रश्न पडलेला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत विहिरीत पडलेली मनीमाऊ हीच या बिबट्यासोबत खोडसाळपणा करते मात्र तरी देखील तो तिला काहीच इजा करत नाही असा हा व्हिडिओ आहे. प्राणी मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार तोपर्यंत वन्यप्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात असतात तोपर्यंत त्यांना त्यांचे स्वातंत्र्य उपभोगायचे असते मात्र जेव्हा त्यांना पिंजऱ्यात कैद करून ठेवले जाते किंवा आता इथे आपला शेवट आहे हे लक्षात येते त्यावेळी त्यांच्या सर्व आशा आकांक्षा कोमेजून जातात आणि शत्रूसोबत लढून काहीही फायदा नाही हे लक्षात आल्यानंतर ते त्याच्यावर हल्ला देखील करत नाहीत. वन्यप्राणी सर्वाधिक किंमत त्यांच्या स्वातंत्र्याला देतात त्यामुळे जर स्वातंत्र्य आपल्यालाच राहिलेले नाही तर इतरांचा जीव घेऊन फायदा तरी काय म्हणून ते हल्ला देखील करत नाही असे सांगण्यात आलेले आहे. स्वातंत्र्याची किंमत काय आहे हे प्राण्यांकडून निश्चितच माणसाने शिकण्यासारखे आहे.
सिन्नर तालुक्यातील टेंभुरवाडी येथे सोमवारी रात्री एका मांजराचा पाठलाग करत असताना बिबट्या सत्तर फूट खोल असलेल्या विहिरीत पडलेला होता. विहिरीत 50 फूट पाणी होते त्यामुळे मांजर आणि बिबट्या या दोघांनीही रात्रभर पोहत राहून आपला जीव वाचवला. सकाळी रहिवाशांना विहिरीमधून बिबट्याचा आवाज आला त्यावेळी त्यांनी तिथे धाव घेतली तेव्हा लोखंडी अँगलवर बिबट्या बसलेला दिसून आला त्यानंतर वनविभागाला याप्रकरणी खबर देण्यात आली आणि वनविभागाने सुदैवाने दोघांचेही प्राण वाचवले आहेत.