डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये रंगायच्या पार्ट्या , हेरगिरी प्रकरणात काय आलं समोर ?

शेअर करा

देशात खळबळ उडवून देणाऱ्या पुणे येथील डीआरडीओ हेरगिरी प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत असून डीआरडीओचा संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ असलेला प्रदीप कुरुलकर हा चक्क पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात असल्याचे एटीएसच्या तपासात समोर येत आहे. सध्या 15 मे पर्यंत त्याला एटीएस कोठडी सुनावलेली असून आरोपी हा अनेक महिलांच्या देखील संपर्कात असल्याचे दिसून येत आहे.

पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली एटीएसने आरोपीकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्याचा फॉरेन्सिक अहवाल समोर आलेला आहे . आरोपी हा डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये अनेक महिलांना भेटत होता. त्याच्याकडे दोन पासपोर्ट असून त्याने शासकीय पासपोर्ट वापरत आत्तापर्यंत पाच ते सहा देशात दौरा देखील केलेला आहे.

आरोपीने हा दौरा कशासाठी केला आणि या दरम्यान तो कुणाकुणाला भेटला याचा देखील तपास करण्याची गरज असल्याचे एटीएसचे म्हणणे असून त्याचे बँक स्टेटमेंट प्राप्त झालेले आहे सोबतच मागील काही दिवसात त्याला बाहेरच्या देशातून पैसे आलेले आहेत का ? याचाही तपास करण्याची गरज आहे. आरोपीने काही जणांचे नंबर ब्लॉक केलेले होते त्यानंतर त्याला मोबाईल नंबर ब्लॉक का केला ? असे देखील मेसेज आलेले आहेत. प्रत्यक्ष संभाषण आणि मेसेजद्वारे माहिती दिल्यानंतर नंबर ब्लॉक केले असावेत असा देखील एटीएसला संशय आहे .


शेअर करा