डेंग्यूच्या पेशंटला प्लेटलेटसऐवजी चक्क मोसंबी ज्यूस शरीरात चढवला , रुग्णाचा मृत्यू

शेअर करा

देशात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आले असून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे एका खासगी रुग्णालयात डेंगू झालेल्या एका रुग्णाला प्लेटलेट ऐवजी चक्क मोसंबीचा रस चढवण्यात आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यानंतर या तरुणाचा मृत्यू झालेला असून सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, प्रदीपकुमार पांडेय असे या तरुणाचे नाव असून खाजगी रुग्णालयात डेंगू झाल्यानंतर तो उपचार घेत होता. त्याच्या शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या 12 ते 13 हजार पर्यंत खाली आल्याने रुग्णालयाकडून आठ युनिट प्लेटलेट हवे असल्याची मागणी करण्यात आलेली होती. नातेवाईक केवळ तीन युनिट प्लेटलेट आणू शकले आणि त्यानंतर प्रदीपच्या प्रकृती थोडी सुधारणा झाली होती मात्र आणखीन पाच युनिट हवे असल्याने रुग्णालय प्रशासनाने 25 हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे दिल्यानंतर या रुग्णालयाने आणखी प्लेटलेट चढवण्यास सुरुवात केली मात्र त्याची रुग्णाची प्रकृती आणखी बिघडली.

हतबल झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी अखेर त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवले त्यावेळी डॉक्टरांनी त्याला आधी ज्या प्लेटलेट्स चढवल्या आहेत त्या प्लेटलेटपैकी एका युनिटची तपासणी केली असता त्या प्लेटलेट नसून केवळ एक मोसंबीचा रस असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी नातेवाईकांना या प्रकाराची कल्पना दिली आणि दरम्यानच्या काळात प्रदीपची प्रकृती आणखीन ढासळल्याने 19 ऑक्टोबर रोजी त्याचा मृत्यू झाला. प्रदीपच्या कुटुंबीयांनी यानंतर प्लेटलेटच्या नावाखाली रुग्णालयाकडून पेशंटला मोसंबी ज्यूस शरीरात सोडण्यात आला असा आरोप करत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे . उत्तर प्रदेशातील आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा हा व्हिडीओ योगी आदित्यनाथ यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे .


शेअर करा