डॉक्टरला बायकोची ‘ तसली ‘ मस्करी पडली महागात , आधी कोमात अन ..

शेअर करा

सुमारे एक आठवड्यापूर्वी डॉक्टर असलेल्या एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्यांना झालेल्या दुखापतीमुळे ते कोमामध्ये गेले आणि त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टर यांचा झालेला मृत्यू हा अनैसर्गिक असल्याची नोंद केलेली होती त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यावेळी जे धक्कादायक सत्य समोर आले ते ऐकून पोलिसांना देखील धक्काच बसला.

उपलब्ध माहितीनुसार, डॉक्टर विकास राजन असे या डॉक्टरचे नाव असून प्रतिभा ( वय 27 ) असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. पोलीस तपासात प्रतिभा आणि तिच्या मित्रांनी डॉक्टर राजन यांच्यावर हल्ला केला होता. त्यांच्या या हल्ल्यामुळे डॉक्टर राजन हे जखमी झाले होते म्हणून त्यांना रुग्णालयात आणण्यात आले होते. आपल्या पत्नीची गंमत करायची म्हणून डॉक्टर राजन यांनी इंस्टाग्रामवर स्वतःच्या पत्नीचे अश्लील फोटो शेअर केले होते

युक्रेनमध्ये शिकून आल्यानंतर डॉक्टर राजन यांना एमबीबीएसची पदवी मिळाली होती त्यानंतर ते डॉक्टर एका खाजगी रुग्णालयात काम करत होते सोबतच परदेशात जाण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील करायचे. दोन वर्षांपूर्वी त्यांची सोशल मीडियावर वास्तुविशारद असलेल्या प्रतिभा यांच्यासोबत ओळख झाली होती. त्यानंतर दोघे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये काही काळ राहिले आणि त्यानंतर त्यांनी कुटुंबियांच्या संमतीने विवाह केलेला होता.

डॉक्टर राजन यांना यासंदर्भात पत्नीने विचारले त्यावेळी त्यांनी , ‘ मी हा प्रकार केवळ गंमत म्हणून केलेला आहे तू काळजी करू नकोस. मी त्यासाठी फेक अकाउंट बनवले आहे ‘, असेही त्यांनी सांगितले होते मात्र पत्नीचे या उत्तराने समाधान झाले नाही आणि तिने तात्काळ ते फोटो डिलीट करून टाकण्याचे सांगितले मात्र डॉक्टरने तिचे ऐकले नाही. 10 सप्टेंबर रोजी प्रतिभा हिने डॉक्टर राजन यांना तिच्या मैत्रिणीच्या घरी नेले आणि त्यानंतर त्यांना बेदम मारहाण केली . त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र अवघ्या तीन दिवसात त्यांचा मृत्यू झाला.


शेअर करा