तंदूर रोटी बनवली तर गुन्हे दाखल करणार , सरकारचे अघोरी फर्मान

शेअर करा

सध्या मध्यप्रदेश सरकारकडून एक आदेश निघाला असून त्यामध्ये तंदूर रोटी बनवण्यासाठी तंदूर भट्टी लावावी लागते त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून जबलपूर जिल्हा प्रशासनाने तंदूर भट्टी वापरण्यास बंदी घातलेली आहे. त्या संदर्भात आदेश देखील जारी करण्यात आलेले असून आता तंदूर भट्टीऐवजी इलेक्ट्रिक किंवा व्यावसायिक गॅस वापरावा असे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे. नियमाचे पालन केले नाही तर पाच लाख रुपयांपर्यंत दंडाची देखील शिक्षा आणि गुन्हा दाखल होईल असे आदेश काढण्यात आले आहेत.

जबलपूर जिल्हा प्रशासनाने या संदर्भात आदेश काढून हॉटेल आणि व्यावसायिक यांना रेस्टॉरंट चालक यांना या संदर्भात नोटीसही पाठवलेली आहे. जिल्हा अन्नसुरक्षा विभागाने पन्नास हॉटेल मालकांना लाकूड आणि कोळशावर आधारित असलेल्या तंदूर भट्टीचा वापर तात्काळ थांबवावा असे सांगितलेले आहे. तंदूर भट्टीमध्ये कोळसा आणि लाकडाच्या धुरामुळे प्रदूषण होते तसेच कार्बन-डाय-ऑक्साइडचे देखील प्रमाण जास्त असते ते आरोग्यास हानिकारक आहे असे सांगण्यात आलेले आहे

हॉटेल व्यावसायिक यांच्या म्हणण्याप्रमाणे तंदूर भट्टीमधील रोटीची चव ही वेगळी असते. भट्टीमधील रोटीची चवही इलेक्ट्रिक किंवा गॅसवर आधारित स्टोव्हवर बनवलेल्या रोटीला येऊ शकत नाही. दुसरा विषय असा आहे की व्यावसायिक गॅस आणि इलेक्ट्रिक ओव्हन यांचा वापर करून अशा पद्धतीने तंदूर रोटी बनवून त्या दरात देणे शक्य होणार नाही. हा निर्णय संपूर्णपणे अयोग्य असून यामध्ये हॉटेल चालक यांच्या कुठलाच विचार केला गेलेला नाही असेही म्हटलेले आहे सोबतच गॅसचा वापर वाढला तर फायदा कुणाचा अन विजेचा वापर वाढला तर फायदा कुणाचा ? असेही त्यांनी विचारलेले आहे.


शेअर करा