तपोवन रस्त्यावरील भाजीबाजार तात्काळ हटवा , जीवितास धोका

शेअर करा

औरंगाबाद रोड आणि मनमाड रोड यांना जोडणारा तसे दाट लोकवस्तीतून जाणारा तपोवन रोड हा सध्या मुख्य वाहतुकीचा रस्ता बनलेला असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सध्या भाजी बाजार भरतो. हा भाजी बाजार तात्काळ स्थानांतरित करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल खाडे यांनी केली आहे. बुऱ्हाणनगर ग्रामपंचायतीकडे त्यांनी ही मागणी केली असून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अमोल खाडे यांनी एक निवेदन दिले असून त्या निवेदनात तपोवन रोडवर दर दिवशी संध्याकाळी भाजी बाजार भरतो. या रस्त्यावरून अनेक अवजड वाहने जात असून भाजी बाजारातील भाजी विक्रेते आणि ग्राहक यांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी देखील निर्माण होते. भरधाव वाहनामुळे इथे अपघात होण्याची शक्यता असून सदर भाजीबाजार हा नगर महापालिका हद्दीत किंवा बुऱ्हाणनगर हद्दीतील इतर कुठेतरी स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.


शेअर करा