तब्बल चार वर्षांनी आरोपी गजाआड , ‘ नको तो ‘ अँगल आला समोर

शेअर करा

देशात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याने एका व्यक्तीने स्वतःच्या छोट्या भावाचे कुऱ्हाडीने वार करून चक्क तुकडे केलेले आहेत. आरोपी याने त्याच्या पत्नीला त्याच्याच लहान भावासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. तब्बल चार वर्षांनी या घटनेचा उलगडा झालेला आहे.

मध्यप्रदेशातील हे प्रकरण असून कोटर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 23 जुलै 2019 रोजी एका गुहेत अर्धवट जळालेला एक मृतदेह आढळून आलेला होता. ऍसिड टाकून हा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पोलिसांना देखील या प्रकरणी काहीही पुरावे सापडत नव्हते. पोलिसांनी त्यानंतर प्रकरणाचा तपास लावण्याचेच ठरवले आणि अखेर आरोपीला गजाआड केले. पोलिसांनी माहिती दिल्याप्रमाणे या तरुणाचा खून त्याच्याच मोठ्या भावाने केल्याचे समोर आलेले आहे.

पोलिसांनी म्हटले आहे की, मयत तरुणाचे त्याच्या वहिनीसोबत अनैतिक प्रेम संबंध होते. भावाने अनेकदा समजावल्यानंतर देखील तो ऐकत नव्हता त्यामुळे संतापाच्या भरात त्याने कुऱ्हाडीने वार करून लहान भावाची हत्या केली आणि त्यानंतर तरुणाचा भाऊ आणि त्याच्या वहिनीने त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. पोलिसांनी आणखी तीन जणांना ताब्यात घेतलेले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

मंदिराजवळ असलेल्या एका गुहेत 23 जुलै 2019 रोजी एक मृतदेह आढळून आलेला होता. सदर युवक हा 19 जुलै पासून बेपत्ता होता त्यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख मोहम्मद जिलानी अशी पटल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाला तपास सुरू केला. काही दिवसांच्या तपासानंतर यश येत नसल्याने हा तपास बंद देखील करण्यात आला होता मात्र साडेतीन वर्षांनी पुन्हा फाईल उघडली आणि त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा उलगडा करत तीन जणांना बेड्या ठोकल्या.

धक्कादायक बाब म्हणजे मयत तरुणाचा भाऊ हाच पोलिसांना गावातील अनेक लोकांवर संशय घेत तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्यानंतर मोहम्मद जिलानी याचे आरोपी असलेला नसीम याची पत्नी आयशा हिच्यासोबत त्याचे अनैतिक संबंध होते . मोठ्या भावाला याप्रकरणी माहिती मिळाल्यानंतर त्याने लहान भावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तो आणि आणि आयशा हे दोघेही ऐकत नव्हते. त्यांना आक्षेपार्ह परिस्थितीत पाहिल्यानंतर नसीम याचा संताप अनावर झाला आणि त्याने लहान भावाचा खून केला . आपला प्रियकर मयत झाल्याचे लक्षात येताच आयशा हिने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास पतीला मदत केली असे तपासात समोर आलेले आहे.


शेअर करा