
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण देखील पोट धरून हसाल. सदर व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला जेवण्यासाठी एका मोठ्या ताटात झाकून डिश आणली जाते. डिश आली हे समजल्यानंतर तो उठून बसतो त्यावेळी डिशमध्ये जो काही पदार्थ असतो तो पाहून त्याला देखील काही सुचत नाही. हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्यापपर्यंत समोर आलेले नसले तरी या व्हिडिओला नागरिकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.
इमानुल स्टीफन नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर हा व्हिडिओ टाकलेला असून वेशभूषावरून यातील नागरिक हे अरब देशातील असल्याचे दिसून येत आहे. एक धिप्पाड शरीरयष्टी असलेला माणूस जेवणासाठी म्हणून बसलेला आहे त्यावेळी दोन जण एका मोठ्या डिशमध्ये झाकून अन्न घेऊन येतात त्यानंतर धिप्पाड माणूस उठून बसतो आणि इतक्या मोठ्या डिशमध्ये काय आणले आहे हे उलगडून पाहतो त्यावेळी त्यामध्ये त्याचा एक मित्र असल्याचे दिसून आल्यानंतर त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. तो देखिल लाडाने त्याला मारतो आणि सर्वजण जोर जोरात हसू लागतात. सदर व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.