तिसऱ्या पतीला व्हिडीओ कॉलवर ‘ नको तो ‘ प्रकार दिसला अन..

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका आगळ्यावेगळ्या हत्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून धक्कादायक बाब म्हणजे या सर्व प्रकारानंतर महिलेला यात प्राण गमवावे लागलेले आहेत. उत्तर प्रदेशातील गाजियाबाद इथे या महिलेची हत्या करण्यात आली आहे. भव्या शर्मा असे तिचे नाव असल्याचे समजते . मयत महिला ही आधी मुस्लिम होती त्यावेळी तिचे नाव बेबी असे होते मात्र त्यानंतर तिने लग्न केल्यानंतर तिचे नाव अंजली झाले त्यानंतर तिने पहिल्या पतीला फारकत देऊन एका अनिस नावाच्या मुस्लीम व्यक्तीसोबत लग्न केले त्यानंतर पुन्हा तिने त्याला देखील फारकत घेऊन तिसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केले त्यावेळी तिचे नाव भव्या शर्मा असे होते. तिसरा पती विनोद शर्मा याने तिची हत्या केलेली असून गाझियाबादच्या सिद्धार्थ विहार येथे 26 डिसेंबर रोजी तिचा मृतदेह आढळून आलेला आहे. मृत्यूसमयी तिचे वय 35 वर्षे होते.

उपलब्ध माहितीनुसार, तिचा मृतदेह हाती आल्यानंतर पोलिसांनी सर्वप्रथम तिचा पती विनोद शर्मा याला ताब्यात घेतले त्यावेळी त्याने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर त्याने या खुनाची कबुली दिली. घटनेमागचे मागचे कारण त्याने जे काही सांगितले ते ऐकून पोलीस देखिल चक्रावून गेले . भव्या हिचा आयुर्वेदिक औषधांचा व्यायसाय असल्याने ती बराच काळ फिरतीवर असायची आणि आपल्या पतीसोबत व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्कात असायची. एकदा व्हिडिओ कॉल करत असताना तिसरापती विनोद याला तिच्यासोबत तिचा दुसरा पती असल्याचे दिसून आले त्यानंतर ती 25 डिसेंबर रोजी विनोद यांच्याकडे आली. दोघांनी रात्री एकत्रित मद्यप्राशन केले आणि त्यानंतर विनोद याने तिचा खून करून तिचा मृतदेह फेकून दिला.

आरोपी विनोद शर्मा हा हरियाणा येथील रहिवासी असून तो देखील आयुर्वेदिक औषधांच्या सप्लाय चेनशी संबंधित आहे त्यातून त्याची ओळख भव्या हिच्यासोबत झालेली होती आणि त्यानंतर त्यांनी भव्या हिने तिचा दुसरा मुस्लिम पती अनिस त्याला तलाक देऊन 2019 मध्ये विनोद शर्मा याच्यासोबत लग्न केले होते. दुसऱ्या पतीचा मुलगा आदिल याला घेऊन ती विनोद याच्यासोबत राहत होती. विनोद हा घरी बसून बहुतांश व्यवसाय करत असल्याने आदिल याचा सांभाळ देखील तोच करत होता. 24 तारखेला भव्या हिने विनोद शर्मा याला फोन व्हिडिओ कॉल केला त्यावेळी तिच्यासोबत तिचा दुसरा पती अनिस व्हिडिओ कॉलमध्ये दिसून आल्यानंतर विनोद याने तिला संपवण्याचा निर्णय घेतला.

25 डिसेंबर रोजी जेव्हा ती विनोद याच्या घरी गाजियाबाद येथे आली त्यावेळी विनोद याने तिला दारू ऑफर केली आणि दोघेही मिळून भरपूर दारू प्याले. मद्यधुंद अवस्थेत भव्या ही बेडवर झोपलेली असताना विनोद याने चाकू तिच्या पोटात भोसकला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला . रक्ताचे डाग असलेले कपडे वाशिंग मशीन मध्ये त्याने धुवून टाकले आणि त्यानंतर तिचा मृतदेह फेकून दिला. सदर घटना उघडकीला आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे .


शेअर करा