‘ तुझे पप्पा ‘ म्हणत प्रियकराची मुलाला ओळख करून दिली पण..

शेअर करा

देशात एक खळबळ जनक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून उत्तर प्रदेश येथील कानपूर येथे नर्स म्हणून काम करणाऱ्या एका महिलेची आणि तिच्या बारा वर्षे मुलाची अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेची हत्या तिच्या प्रियकराने केलेली असून आरोपीने यानंतर पोलीस दलात निवृत्त झालेल्या त्याच्या एका नातेवाईकाला याप्रकरणी माहिती दिली आणि त्या नातेवाईकाने आणि आरोपीने हे प्रकरण म्हणजे आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र पोलिसांनी अखेर या आरोपी प्रियकराला बेड्या ठोकलेल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, सीमा असे मयत महिलेचे नाव असून तिच्या बारा वर्षे मुलाची आदित्य याची देखील हत्या करण्यात आली आणि रविवारी त्यांचे मृतदेह राहत्या घरात आढळून आलेले होते. आदित्य याला गळफास लावलेला होता तर सीमा हिला तिचा मृतदेह बेडवर पडलेला होता. दोघांचाही गळा आवळून खून करण्यात आला होता त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा मयत सीमा हिचे शेजारी राहणाऱ्या नरेंद्र नावाच्या एका तरुणासोबत प्रेम संबंध असल्याची माहिती समोर आली आणि पोलिसांनी नरेंद्र याला ताब्यात घेतले. त्याने जे काही सांगितले त्यावर पोलिसांचा देखील सुरुवातीला विश्वास बसला नाही.

सीमा ही एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. तिचा पगार देखील चांगला होता मात्र तिच्या पतीसोबत पटत नसल्याने ती मुलाला घेऊन वेगळी राहत होती याच दरम्यान तिचे शेजारी राहणारे नरेंद्र याच्यासोबत प्रेम संबंध जुळले आणि तिचा पहिला पती दिवाकर याला सोडून ती नरेंद्र याच्यासोबत राहायला आली. सीमा हिचा मुलगा देखील तिच्यासोबतच राहत होता त्यावेळी सीमा हिने त्याला नरेंद्र याची ओळख करून देताना आता हेच तुझे बाबा आहेत असे सांगितले होते.

सीमा हिने तिचा पहिला पती दिवाकर याला घटस्फोटाचे कागद पाठवून दिले मात्र दुसरीकडे नरेंद्र याला तिच्यासोबत लग्नच करायचे नव्हते म्हणून त्याने पाच वर्ष आज उद्या आज उद्या करत वेळ मारून नेली तर दुसरीकडे सीमा ही त्याला सतत लग्नासाठी तगादा करत होती त्यामुळे त्याने तिचा गळा आवळून खून केला आणि हा प्रकार तिच्या मुलाने पाहिला म्हणून नरेंद्र याने त्याचाही खून केला. सीमा हिचा पती दिवाकर याने नरेंद्र आणि पोलीस दलातून निवृत्त झालेला त्याचा काका याच्याविरोधात पोलिसात तक्रार दिलेली असून नरेंद्र याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत तर त्याचा काका अद्यापपर्यंत फरार आहे.


शेअर करा