‘ तुझ्यासहीत अख्ख विमान खरेदी करेल ‘ , भाजप नेत्याचे हवाई सुंदरीसोबत गैरवर्तन

शेअर करा

भाजपचे आमदार खासदार कार्यकर्ते या सर्वांच्याच डोक्यात सत्तेची धुंदी गेलेली असून असाच एक आणखीन प्रकार आता समोर आलेला आहे. भाजपचा एक नेता हवाई सुंदरीसोबत गैरवर्तन करताना आढळून आल्यानंतर अखेर विमानातून उतरण्यास त्यांना भाग पाडण्यात आलेले आहे. सदर प्रकरणात आरोपी असलेले भाजप नेते यांनी चक्क एका हवाई सुंदरीला ‘ तुझ्यासोबत हे विमान देखील मी खरेदी करू शकतो ‘ असे म्हणत तिच्यासोबत गैरवर्तन केलेले होते. सुजित दास चौधरी असे या भाजपच्या नेत्याचे नाव आहे.

सुजित दास हे आसामच्या सिलचर येथील कुंभीरग्राम विमानतळावरून कोलकत्ता इथे जाणाऱ्या विमानात बसलेले होते. उड्डाणाच्या वेळी असलेल्या नियमांचे उल्लंघन करत ते मोबाईलवर बोलत होते त्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना मोबाईल वापरू नका असे सांगितले मात्र यामुळे भाजप नेत्यांचा अहंकार दुखावला गेला आणि त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली.

काही मिनिटातच ते विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करू लागले आणि त्यानंतर ‘ तुझ्यासह हे विमान खरेदी करायची माझी ताकद आहे ‘ असे म्हणत हवाई सुंदरीसोबत देखील त्यांनी गैरवर्तन केले. कॅप्टन यांनी अखेर हस्तक्षेप करत चौधरी यांना बेशिस्त वर्तनाबद्दल उतरवण्यास सांगितले. विमानातून उतरवल्यानंतर देखील या महाशयांनी विमानाच्या खराब स्थितीमुळे आपण स्वतःच विमानात बसलो नाही असे म्हटलेले आहे.


शेअर करा