तुम्हाला लाख वेळा विकू शकतो , ललित मोदी यांची धमकीवजा पोस्ट

शेअर करा

आयपीएलचे माजी चेअरमन आणि मनी लॉन्ड्री प्रकरणी सध्या विदेशात फरार असलेले ललित मोदी सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलेले असून त्यांनी चक्क इंस्टाग्रामवर ज्येष्ठ वकील असलेले मुकुल रोहतगी यांना एक धमकीवजा इशारा देणारी पोस्ट शेअर केलेली आहे.

काय आहे ललित मोदी यांची पोस्ट ?

मला आयुष्यात कधीही तुम्ही फरारी बनू नका ही नम्र विनंती. पार्टीमध्ये आणि इतरत्र ठिकाणी माझ्या बाबत चर्चा करताना केवळ मिस्टर मोदी असाच उल्लेख करा. पुन्हा मी इतके नम्रपणाने तुम्हाला सांगणार नाही. आपण काचेच्या घरात राहतो आणि काही देशांमध्ये रस्त्यावरही फिरतो. सर्वच काही सुरक्षित नाही मला देखील बसने जवळपास धडक दिली होती त्यामुळे आयुष्य लहान आहे हे लक्षात ठेवावे.

एक महत्त्वाचा सल्ला म्हणून तुम्हाला हे सांगतो आणि तुम्हाला माझा सल्ला ऐकायचंच नसेल तर तुम्हाला हे देखील माहिती आहे की नाही मी देवाची आवडती व्यक्ती आहे तोच माझे रक्षण करतो. वकील रातोरात न्यायाधीशांना विकत घेत असतील पण मी तुम्हाला लाख वेळा खरेदी करून विकू शकतो. तुम्ही माझ्यासाठी मुंगी आहात तुमचे नशीब चांगले की मला मुंग्या देखील आवडतात म्हणून मी तुम्हाला चिरडणार नाही पण एक वचन देतो जगभरातल्या कुठल्याही माध्यमांमध्ये माझ्याबद्दल तुम्ही असे काही म्हटल्याचे दिसल्यास तुम्हाला मी न्यायालयात खेचेल. सदर पोस्टची चर्चा सुरू झाल्यानंतर ललित मोदी यांनी ही पोस्ट डिलीट केलेली असून डिलीट केलेल्या पोस्टचे स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडिया वायरल होत आहेत.


शेअर करा