‘ तुम्ही फक्त .. ‘, मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शेतकऱ्याची आत्महत्या

शेअर करा

राज्यात अतिवृष्टीने थैमान घातलेले असून अनेक शेतकऱ्यांना त्यामुळे असंख्य अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने पिकाचे मोठे नुकसान झाले असून त्यातून नैराश्य आल्याने पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आत्महत्या केलेली आहे. 17 तारखेला हे प्रकरण समोर आले असून 45 वर्षीय शेतकऱ्याने कर्जदारांच्या त्रासाला तसेच पिकाला योग्य दर न मिळाल्याने तलावात उडी मारून आपले आयुष्य संपवलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, दशरथ लक्ष्मण केदारी असे शेतकऱ्याचे नाव असून पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद गावात त्यांची शेती आहे. गेल्या काही महिन्यांपासून अतिवृष्टी झाल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले त्यात कर्जदारांच्या देखील पैशासाठी तगादा सुरू झाला म्हणून अखेर नैराश्यातून त्यांनी तलावात उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहलेली असून त्यामध्ये पिकाला योग्य दर मिळाला नाही तसेच कर्जदारांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत आहोत असे म्हटले आहे सोबतच नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसाच्या देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

दशरथ केदारी यांनी आपल्या आत्महत्येसाठी राज्य आणि केंद्र सरकारला देखील जबाबदार ठरवले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे. कोरोना आणि अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या निष्क्रियतेला देखील त्यांनी जबाबदार ठरवत ‘ तुम्ही फक्त स्वतःच्या एकट्याबद्दल विचार करत आहात ‘ असेही मोदी यांना उद्देशून म्हटले आहे.


शेअर करा