तू कधी मला फोन दिला ? , नगरमध्ये हातोहात फोन केला लंपास

शेअर करा

नगर शहरात किरकोळ कारणावरून भांडणे होण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून अशीच एक ताजी घटना केडगाव परिसरात समोर आलेली आहे. एका व्यक्तीने तात्पुरता फोन करायला म्हणून मोबाईल घेतला आणि त्यानंतर फोन परत न देता दुचाकीवरून पलायन केले. फोन परत मागितल्याच्या रागातून आरोपीने बस कंडक्टर असलेल्या एका व्यक्तीला मारहाण करून लुटण्याचा प्रकार कायनेटिक चौकात समोर आलेला आहे. 31 तारखेला रात्री आठच्या सुमारास ही घटना घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , मिथुन भीमराव सकट ( राहणार सुवर्ण नगर केडगाव ) असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव असून आरोपीचे नाव आकाश पवार असे असल्याची माहिती आहे. तक्रारदार व्यक्ती गुरुवारी त्यांच्या बहिणीकडे निंबळकला रक्षाबंधनासाठी गेलेले होते. रात्री आठच्या सुमारास ते परत आले आणि कायनेटिक चौकात एका टपरीवर काही काळ थांबलेले होते.

तक्रारदार व्यक्ती तिथे थांबलेले असताना त्यांच्यासोबत ओळख असलेला आकाश पवार तिथे आला आणि त्याने दोन मिनिट मला तुमचा फोन द्या मला एक फोन करायचा आहे असे सांगत मोबाईल मागितला. तक्रारदार व्यक्ती यांनी त्याला फोन दिला मात्र फोन परत न करता दुचाकीवरून तो तिथून निघून गेला . अर्ध्या तासाने परत आला त्यावेळी तक्रारदार व्यक्ती यांनी त्याला पुन्हा फोन मागितला मात्र त्याने वाद घालायला सुरुवात केली आणि तू मला फोन दिलाच नाही असे देखील तो म्हणाला त्यानंतर तक्रारदार व्यक्ती यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत आकाश पवार याच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे.


शेअर करा