‘ तू काय माधुरी दीक्षित आहे का ? ‘ , दोन्ही आरोपी पोलिसांनी घेतले ताब्यात

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार जळगाव इथे समोर आलेला असून घराच्या ओट्यावर कपडे धुत असताना विवाहितेने अंगावर पाणी उडेल असे सांगितल्यानंतर राग आल्याने दोन जणांनी तिला ‘ तू काय माधुरी दीक्षित आहे का ? एक ना एक दिवस तुला उचलून घेऊन जाईल ‘ असे म्हणत तिचा विनयभंग केलेला आहे. पीडित महिला ही विवाहित असून रावेर तालुक्यातील एका गावातील ही घटना आहे.

उपलब्ध माहितीनुसार , युनूस तडवी आणि इरफान नामदार तडवी अशी आरोपी व्यक्तींची नावे असून रावेर तालुक्यातील एका गावात पीडित महिला ही कुटुंबासोबत राहते. ती तिच्या घराच्या ओट्यावर कपडे धुत असताना दोन्ही आरोपी तिथे उभे होते त्यावेळी उभे राहून ते तिला न्याहाळत होते त्यावेळी विवाहित असलेल्या महिलेने तुम्ही इथे उभे का राहिलात तुमच्या अंगावर पाणी उडाले तर तुम्ही मलाच बोलताल असे ती म्हणाली.

विवाहित महिलेने असे म्हटल्यानंतर आरोपीला युनूस याला राग आला आणि त्याने त्या महिलेकडे पाहून ‘ आता तर तुला फक्त पाहत आहे.. तू काय माधुरी दीक्षित आहे का ? एक ना एक दिवस तुला उचलून घेऊन जाईल ‘ असे तो म्हणाला सोबतच त्याच्याबरोबर असलेला इरफान याने देखील विवाहितेला उद्देशून त्याच्याशी होकार मिळवत ‘ आम्ही तुला एकदा एक दिवस उचलून घेऊन जाऊ ‘ असे देखील तो म्हणाला .

पीडित महिलेने पोलिसात दाखल होत आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे. रावेर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील यांनी विवाहित महिलेची घटनास्थळी जाऊन भेट घेतली आणि गुन्हा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश सानप हे करत असल्याची माहिती आहे. आरोपींनी विवाहितेसोबत लज्जा उत्पन्न होईल असे देखील कृत्य केलेले असून वाद निर्माण झाल्यानंतर जर कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी देखील धमकी त्यांनी दिलेली होती असे पिडीतेचे म्हणणे आहे.


शेअर करा