‘ तेंडल्या ‘ चित्रपटाला महाराष्ट्रभर उस्फुर्त प्रतिसाद , कसा आहे चित्रपट ?

शेअर करा

बॉलीवूडच्या तुलनेत मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन प्रयोग सध्या मोठ्या प्रमाणात होत असून असे नाविन्यपूर्ण प्रयोग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. अवघ्या तीन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘ तेंडल्या ‘ चित्रपटाला महाराष्ट्रभर उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून तेंडल्या चित्रपटाची थीम आणि स्क्रीन प्ले तसेच कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसून येत आहे .

ग्रामीण पातळीवर तेंडुलकर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलाचा संघर्ष चित्रपटात दाखवलेला असून सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल ठेवून हा मुलगा क्रिकेटर होण्याचे स्वप्न पाहतो त्यावेळी त्याला येत असलेल्या अडचणी आणि त्यासाठी त्याने केलेला संघर्ष या चित्रपटात सुनंदन लेले यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडलेला आहे. ग्रामीण पातळीवर तरुणांना क्रिकेटच्या ग्लॅमर दुनियेत जाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो त्याचे प्रभावी चित्रण या चित्रपटांमध्ये करण्यात आलेले असून मराठी प्रेक्षकांच्या हा चित्रपट पसंतीस उतरताना दिसून येत आहे.


शेअर करा