तोंड पाहिले आहे का ? सीमा हैदरवर भडकला तिचा पाकिस्तानी पती

शेअर करा

पाकिस्तानची सीमा हैदर भारतात आल्यानंतर तिची माध्यमात जोरदार चर्चा असून नुकतेच तिने रक्षाबंधन देखील साजरे केलेली आहे . सीमा हैदर ही गुप्तहेर असल्याच्या संशयातून तिची चौकशी देखील करण्यात आली मात्र तिच्या विरोधात काहीही पुरावे अद्यापपर्यंत तरी हाती लागलेले नाहीत. ती आणि तिचा प्रियकर सचिन मीना यांच्या आयुष्यावर सध्या कराची टू नोएडा हा चित्रपट या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून हे वृत्त पाकिस्तानमधील तिच्या पतीला समजल्यानंतर त्याने तिची टिंगल उडवलेली आहे.

गुलाब हैदर असे तिच्या आधीच्या पतीचे नाव असून त्याने सीमा हैदरवर चित्रपट काढणाऱ्या व्यक्तीला लाज वाटली पाहिजे असे म्हटलेले आहे. गुलाब हैदर म्हणाला की कुणाच्या तरी वैयक्तिक आयुष्यावर तुम्ही चित्रपट काढताय , हे सर्व काही राजकारणासाठी केलं जात आहे. मला सीमा आणि सचिन यांचे लग्न मान्य नाही एखादी महिला घटस्फोट न घेता बाहेरच्या पुरुषासोबत राहत असेल तर त्याला काय म्हणावे. गुलाब हैदर पुढे म्हणाला की , ‘ तुम्ही सीमाचे तोंड पाहिले आहे का ती अभिनेत्री होण्यासाठी पात्र नाही. जशी सीमा आहे तसाच तो दिग्दर्शक देखील आहे ‘, असेही त्याने म्हटलेले आहे.


शेअर करा