‘ त्याच ‘ वेळेला कारने दिला दगा , गाढवाला बांधून वाजतगाजत गाठलं शोरूम : पहा व्हिडीओ

शेअर करा

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही असाच एक प्रकार राजस्थानच्या उदयपूर इथे समोर आलेला असून एका तरुणाने कार खरेदी केल्यानंतर अवघ्या दीड महिन्याच्या आत ही कार बिघडली . कार बिघडल्यानंतर हा तरुण वैतागून गेला आणि अनेकदा तो ही कार सर्विस सेंटरला घेऊन गेला मात्र सातत्याने ही कार त्याला दगा देत होती. साखरपुड्यासाठी तो सासुरवाडीला गेला आणि त्यानंतर सासुरवाडीच्या लोकांसमोरच कारने त्याला दगा दिला त्यावेळी त्याला ओशाळल्यासारखे झाले.

सदर तरुणांनी कार दुरुस्ती करण्यासाठी कार्यालयात फोन केला मात्र कंपनीने नेहमीप्रमाणे त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि या नंबरवर त्या नंबरवर अशा स्वरूपात त्याला वर्तणूक दिली. धक्कादायक बाब म्हणजे तरुणाने त्यानंतर चक्क ही कार गाढवांना बांधली आणि शोरूममध्ये घेऊन गेला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

हुंडाई कंपनीची क्रेटा ही कार असून उदयपूरच्या सुंदरवास येथे राहणारे राजकुमार पुरबिया यांनी हा प्रकार केलेला आहे. कंपनीला त्यांनी फोन करून गाडी येथून घेऊन जाणे विषयी सांगितले होते मात्र कंपनीच्या सिस्टीममध्ये इकडून तिकडे फोन फिरवणे यापलीकडे काहीही कारवाई झाली नाही त्यामुळे त्यांनी राग आल्यानंतर आपला निषेध व्यक्त करण्याचा एक वेगळाच मार्ग निवडला. गाढवाकडून गाडी खेचत ते शोरूमपर्यंत घेऊन गेले. सदर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

राजकुमार यांनी खरेदी केलेली कार क्रेटा कारचे दुसरे टॉप मॉडेल असून साडेअठरा लाख रुपये अशी त्याची किंमत आहे. सुमारे दीड महिन्यातच गाडीला समस्या समस्या निर्माण झाली त्यानंतर त्यांनी कंपनी अधिकाऱ्यांना देखील याविषयी सांगितले मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. राजकुमार यांनी माध्यमांशी बोलताना साखरपुड्यासाठी ही कार नेली होती मात्र तिथे तिने दगा दिला तर कंपनी अधिकाऱ्यांनी देखील दगा दिला त्यामुळे आपण हा प्रकार केला असे म्हटलेले आहे .


शेअर करा