‘ त्या ‘ महिलेसोबतची लिव्ह इन रिलेशनशिप महागात , प्रियकराने गमावले प्राण

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या डोंबिवली इथे समोर आलेले असून एका महिलेने मित्राच्या मदतीने चक्क स्वतःच्या प्रियकराची हत्या केली आहे . डोंबिवलीतील कोळेगाव परिसरात शनिवारी ही घटना घडलेली असून मानपाडा पोलिसांनी रविवारी आरोपी महिला आणि तिच्या नवीन प्रियकराला ताब्यात घेतलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मारुती हांडे असे मयत व्यक्ती यांचे नाव असून ते या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये डोंबिवलीतील कोळेगाव परिसरात राहत होते. दरम्यानच्या काळात सदर महिलेचे गुड्डू शेट्टी नावाच्या एका व्यक्तीसोबत प्रेम संबंध सुरू झाले आणि त्यातून मारुती आणि ही महिला यांच्यात वाद सुरू झाले.

शनिवारी संध्याकाळी त्यांच्यात वाद सुरू झाल्यानंतर मारुती हे तिला गुड्डूचा नाद सोड असे सांगत होते मात्र ती त्यांचे ऐकत नव्हती त्यावेळी गुड्डू देखील घरात होता. गुड्डू आणि ही महिला यांनी मारुती यांना बॅट आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली त्यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सदर महिला आणि तिचा प्रियकर यांना बेड्या ठोकलेल्या आहेत .


शेअर करा