दवाखान्यातून डिस्चार्ज पण जाणार कुठे ? खचलेला देह अन हातात युरीन बॅग

शेअर करा

देशात सध्या वेगळेच प्रकरण चांगलेच चर्चेत आले असून एका वृद्ध पित्याला सांभाळण्यास दोन्ही मुलांनी नकार दिलेला आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ इथे हे प्रकरण समोर आले असून या या दोनही मुलांचे समुपदेशन करण्यात आले मात्र अखेर वडिलांनीच त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिलेला आहे. वृद्ध व्यक्तीच्या तक्रारीवरून त्यांचा मुलगा विजय आणि ब्रजेश यांच्याविरोधात मारहाण आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वृद्धाश्रमांमध्ये कमीत कमी दोन वेळ जेवण मिळेल आणि निवारा मिळेल त्यामुळे आता आपण येथेच राहणार असून पुन्हा मुलांसोबत घरी जाणार नाही अशी भूमिका या वडिलांनी घेतलेली आहे.

पीडित वृद्ध व्यक्ती रामेश्वर प्रसाद यांनी त्यांच्या मुलावर आरोप करताना दोन्ही मुलांनी आपला अनेकदा छळ केला. मोठ्या मुलाने तर चक्क मारहाण देखील केली आणि घरातून हाकलून दिले. आजारी असताना हातात युरीन बॅग घेऊन आपण बाहेर पडलो मात्र तरीदेखील मुलांनी आपल्याला थांबण्यासाठी आग्रह केला नाही असे म्हटलेले आहे. सदर वृद्ध व्यक्ती रस्त्यावर युरीन बॅग घेऊन फिरत असताना वन स्टॉप सेंटर नावाच्या समाजसेवी संघटनेने त्यांची दखल घेतली आणि त्यांना वृद्धाश्रमात दाखल केले. रामेश्वर प्रसाद यांचे वय 85 वर्षे असल्याचे समजते.

आपल्याला दोन कमावती मुले असून चार मुले आहेत असे त्यांनी सांगितले असून आपल्या भावांनी वडिलांना बाहेर काढून दिले म्हणून त्यांच्यावर अशी वेळ आली असे मुलींनी सांगितले आहे मुलींनी देखील मुलांकडे जा आमच्याकडे ठेवू शकत नाही असे सांगितल्यानंतर रस्त्यावर येण्या पलीकडे या वृद्ध व्यक्तीकडे कुठलाच पर्याय राहिलेला नव्हता रस्त्यावर युरीन बॅग घेऊन सोमवारी लखनऊ येथील सरोजनी नगर परिसरात ते फिरत असताना सामाजिक संघटन समाजसेवी संघटनेने त्यांना चौकशी करून वृद्धाश्रमात दाखल केले आहे

रामेश्वर प्रसाद हे मसाल्याचे काम करत होते. रक्ताचे पाणी करून त्यांनी आपल्या सहा अपत्यांचा सांभाळ केला त्यानंतर मुलींची लग्नही झाली आणि त्या आपापल्या घरी गेल्या. दोन मुलांपैकी एक मुलगा हा वाहनचालक असून त्याने आपल्याला घराबाहेर काढले त्यानंतर दुसऱ्या मुलाकडे गेल्यानंतर त्याने देखील आपल्याला त्याच्यासोबत ठेवण्यास नकार दिला अशातच प्रकृती बिघडली म्हणून ते दवाखान्यात दाखल झालो मात्र तिथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर कुठे जायचे म्हणून आधी घरी गेल्यानंतर ते एका बस स्टॉपवर युरीन बॅग घेऊन बसलेले होते. माझी कमाई बंद झाल्यानंतर मुलांसाठी मी केवळ ओझे बनलेलो आहे असे त्यांनी म्हटले असून मोठ्या मुलाने मला दोन वेळा मारहाण केलेली आहे. सध्या माझी जेवण्याची आणि औषधाची सोय निर्माण झाल्याने आता यापुढे आपण वृद्धाश्रमात याच राहणार आहोत असेही त्यांनी सांगितले आहे.


शेअर करा