दहा राज्यात सत्तावीस बायका सांभाळत होता , ‘ असा ‘ आला जाळ्यात की ..

शेअर करा

देशात एक अत्यंत खळबळजनक असा प्रकार ओडिसा राज्यात समोर आलेला असून एका व्यक्तीला तब्बल 27 बायका असल्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे. रमेश स्वन उर्फ विभू प्रकाश स्वॅग असे त्याचे नाव आहे. तब्बल दहा राज्यात त्याने 27 बायका केल्याचा केल्याचे समोर आल्यानंतर त्याने त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आलेले आहे . धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टर चार्टर्ड अकाउंटंट आणि इतर मोठ्या मुद्द्यावर असलेल्या महिला देखील त्याच्या या जाळ्यात अडकलेल्या आहेत.

रमेश याला 2011 साली हैदराबाद येथे अटक करण्यात आलेली होती त्यावेळी पालकांच्या मुलांना त्याने एमबीबीएसला प्रवेश घेऊन देतो असे सांगून प्रत्येक पालकाकडून सुमारे दोन कोटी रुपये उकळलेले होते मात्र त्याआधी देखील त्याने 2006 मध्ये केरळच्या तेरा बँकांना 128 बनावट क्रेडिट कार्डच्या माध्यमातून चांगलाच चुना लावलेला होता त्यावेळी देखील त्याला अटक करण्यात आलेली होती.

ओडीसा पोलिसांची एक टीम गेल्या आठ महिन्यांपासून रमेश याच्यावर नजर ठेवून होती. 13 फेब्रुवारी रोजी त्याला अटक करण्यात आली कारण 2021 मध्ये त्याच्या अनेक पत्नींपैकी एक पत्नी असलेली महिला हिने दिल्ली पोलिसांकडे त्याच्या विरोधात तक्रार केली होती. आरोपीने तिची देखील फसवणूक केली होती 2018 मध्ये त्याने तिच्या सोबत विवाह केला आणि त्यानंतर त्याने भुवनेश्वर येथे तीन अपार्टमेंटमध्ये तीन बायका राहण्यास ठेवलेल्या होत्या. बँक खाते फ्रीज झालेले आहे असे सांगत त्याने या महिलांकडून पैसे घेतले त्यानंतर तो दुसऱ्या बायकांकडे जायला जायचा आणि तिथे देखील असाच बहाना करून त्यांच्याकडूनही पैसे घ्यायचा असे आतापर्यंतच्या तपासात समोर आलेले आहे.


शेअर करा