दिवाळी ऑफर म्हणून चक्क जिवंत कोंबडी अन दारूची बाटली फ्री , प्रतिसाद कसा आला ?

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका दुकानदाराच्या आगळ्यावेगळ्या दिवाळी ऑफरची जोरदार चर्चा सुरू असून आपल्याकडील वस्तूंची विक्री व्हावी म्हणून या दुकानदाराने चक्क एक जिवंत कोंबडी आणि तिच्यासोबत एक दारूची बाटली अशी भन्नाट ऑफर सुरू केली होती. विशेष म्हणजे या दुकानदाराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळाला. पंजाबमधील हे प्रकरण असून या दुकानदाराच्या आगळ्यावेगळ्या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे.

पंजाबमधील अमृतसर येथील ही घटना असून सदर दुकानदार हा मोबाईल विक्रेता असल्याचे समजते. दिवाळीत मोबाईलची जोरात जोरदार विक्री होण्यासाठी त्याने हे अनोखी ऑफर सुरू केली आणि दुकानाच्या बाहेरच ग्राहकाला जिवंत कोंबडी आणि एक दारूची बाटली अशी ऑफर देत एका व्यक्तीला दुकानाच्या बाहेर उभे केले होते. त्याची ही जोरदार ऑफर ऐकल्यानंतर त्याच्या दुकानासमोर जोरदार मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि विशेष म्हणजे या गर्दीत पोलिसांचा देखील सहभाग होता.

दुकानातून दारूची बाटली आणि जिवंत कोंबडी घेऊन जाताना अनेक जणांनी दुकानासमोर सेल्फी देखील काढले आणि त्यातून दुकानदाराच्या दुकानाची देखील मोठ्या प्रमाणात जाहिरात झाली. अमृतसरमधील हुसेन पुरा येथे हे दुकान असून सदर मोबाइल विक्रेता हा अनेक वर्षांपासून मोबाइल विक्रीचा व्यवसाय करतो. दिवाळीत मोठ्या प्रमाणात मोबाइलची विक्री होईल या आशेने त्याने मोठ्या प्रमाणात खरेदी देखील केली होती. मोबाईल विक्रीसाठी ही अनोखी स्कीम राबवली आणि त्याला ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेक ग्राहकांनी स्वतःचे सेल्फी काढून या दुकानदाराची देखील जोरदार जाहिरात केली आणि दुकानदाराची दिवाळी देखील जोरात झाल्याचे समजते.


शेअर करा