देशातील सर्व मंदिरे भटमुक्त करावीत अन्यथा आंदोलनाचा इशारा

शेअर करा

नाशिकच्या काळाराम मंदिरातील पुराणोक्त वेदोक्त प्रकरणानंतर मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी राज्यातील सर्व मंदिरातील ब्राह्मण पुजारी हटवण्याची मागणी केलेली आहे. राज्यातील आणि देशातील मंदिरात असलेला पैसा हा गोरगरिबांसाठी आणि त्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी खर्च करावा असे देखील त्यांनी पुढे म्हटले आहे.

पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले की, ‘ देशातील सर्व मंदिरे भट मुक्त करावेत आणि मंदिरातील पुजारी हटवावेत अन्यथा आगामी काही दिवसात मराठा सेवा संघाकडून आंदोलन करण्यात येईल ‘ . पुरुषोत्तम खेडेकर यांनी याआधी अनेकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल देखील अनेक वादग्रस्त ठरतील अशी वक्तव्य केलेली आहेत . त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा जातीय तणाव निर्माण होण्याची देखील शक्यता आहे.

रामनवमीच्या पार्श्वभूमीवर संयोगिता राजे छत्रपती यांनी नाशिक येथील काळाराम मंदिराला भेट दिली होती त्यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली तेव्हा महंत यांनी पुराणोक्त पद्धतीने पूजा करण्यास सुरुवात केलेली होती त्यावेळी संयोगिता राजे छत्रपती यांनी यास विरोध दर्शवला आणि पूजा वैदिक पद्धतीने करावी असे सांगितले हा सर्व प्रकार त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर पुराणोक्त आणि वेदोक्त पद्धतीच्या मंत्रांची चर्चा सुरू झालेली आहे.


शेअर करा