मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य , काँग्रेस नेत्याची कोठडीत रवानगी

शेअर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री राजा पटेरिया यांना मंगळवारी अटक करण्यात आलेली आहे. त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

राजा पटेरिया यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना, ‘ संविधान आणि अल्पसंख्याक दलित तसेच आदिवासीचे भविष्य वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्यासाठी तयार रहा. मारणे म्हणजे पराभूत करणे ‘, असे म्हटले होते . त्यांच्या वक्तव्याच्या संदर्भात मध्यप्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनी प्रतिक्रिया देताना व्हायरल व्हिडिओमध्ये जर काहीही सत्यता असेल तर आम्ही अशा विधानाचा निषेध करतो , पंतप्रधान मोदी यांना आम्ही दीर्घायुष्य चिंतितो , असे म्हटले आहे.


शेअर करा