देशात सर्वत्र ‘ अनोखा मॉल ‘ ची चर्चा , गरिबांसाठी ठरतोय वरदान कारण..

शेअर करा

देशातील अनेक मॉलमध्ये महागडे कपडे विकले जातात. बाजारात इतरत्र कमी दरात मिळणारी वस्तू काही वेळा मॉलमध्ये महाग देखील मिळते मात्र उत्तर प्रदेश येथील एक मॉल सध्या चांगलाच चर्चेत आलेला असून लखनऊ येथे हा अनोखा मॉल सुरू झालेला आहे. उत्तर भारतात थंडीची लाट असल्याने आर्थिक परिस्थिती खराब असल्याकारणाने अनेक जणांना कपडे थंडीपासून बचावासाठी कपडे मिळत नाही त्यामुळे या मॉलने चक्क मोफत कपडे देण्यास सुरुवात केलेली आहे.

विशेष म्हणजे समाजातील अनेक दानशूर लोकांनी दिलेले उबदार कपडे तसेच इतरही कपडे वस्तू या मॉलमध्ये ठेवण्यात येतात त्यातील आपल्याला जी वस्तू हवी आहे ती आपण मोफत घेऊन जाऊ शकतो. गरीब कुटुंबातील व्यक्ती यांच्यासाठी हा मॉल म्हणजे वरदान ठरत असून अनेक गरीब कुटुंबातील व्यक्तींना या मॉलचा फायदा होत आहे. अनोखा मॉल असे या मॉलचे नाव असून अनेक गोरगरीब नागरिकांची दुवा या मॉलचालकाला मिळत आहे .


शेअर करा