
एक अत्यंत खळबळजनक अशी घटना उत्तर प्रदेशात समोर आलेली असून लखनऊ इथे नवरदेवाच्या गळ्यात लग्नात माळ टाकत असताना एका नववधूला हार्टअटॅक आला आणि त्यात तिने आपले प्राण गमावले. शिवांगी असे या वधूचे नाव असून सदर घटनेनंतर मंगलमय वातावरण अचानक शोकाकुल झाले.
उपलब्ध माहितीनुसार, लखनऊ येथे ही घटना घडली असून शिवांगी असे वधूचे नाव आहे. पतीच्या गळ्यात वरमाला घालण्यासाठी ती मंचावर आली मात्र तिला अचानकपणे चक्कर आली आणि ती खाली पडली. दवाखान्यात दाखल केले त्यावेळी डॉक्टरांनी ती मयत असल्याचे सांगितले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने तिने अवघ्या काही क्षणात आपले प्राण गमावले आहेत.
मयत मुलीचे कुटुंबीय भदवाना येथील रहिवासी असून शुक्रवारी रात्री शिवांगी हिचे लग्न होते. लग्न विधी झाल्यानंतर आणि त्यानंतर मंगलाष्टके झाल्यावर अवघ्या काही क्षणात ती पतीच्या गळ्यात माळ घालणार इतक्यात तिला चक्कर आली आणि ती स्टेजवर पडली. लग्नाच्या आधी पंधरा ते वीस दिवस तिची तब्येत खराब होती. तिचा ब्लडप्रेशर देखील कमी झालेला होता. लग्नाच्या दिवशी देखील तिची प्रकृती व्यवस्थित नव्हती मात्र लग्नविधी असल्याने त्याकडे डोळेझाक करण्यात आली आणि भर मांडवातच शिवांशी हिने शिवांगी हिने प्राण गमावले .