धर्मांध व्यक्तीच्या डोळ्यात अंजन घालणारी किरण माने यांची पोस्ट नक्की वाचा

शेअर करा

महाराष्ट्रात सध्या धार्मिक सलोखा बिघडू शकतो असे वातावरण असून कोल्हापुरात दंगल सदृश्य परिस्थिती झालेली होती. महाराष्ट्राच्या हिंदू मुस्लिम एकतेला काही विकृत व्यक्तींकडून जाणीवपूर्वक केलेल्या प्रकारामुळे परिस्थिती बिघडत असून असल्याचे गेल्या काही प्रकरणात दिसून येत आहे. त्रिंबकेश्वर देवस्थान येथे मुस्लिम बांधवांनी धूप जाळला म्हणून काही सनातनी प्रवृत्तींनी वाद निर्माण केलेला होता या पार्श्वभूमीवर अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केलेली आहे. धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या विकृत प्रवृत्तीच्या विरोधात किरण माने यांची पोस्ट सोशल मीडियात जोरदार व्हायरल झालेले आहे.

काय आहे किरण माने यांची पोस्ट ?

तुकोबारायांची पालखी सजवायचं काम लै जोशात सुरू हाय भावांनो. सगळ्या वारकर्‍यांचं मन मोहून टाकनारा चांदीचा रथ झळकायला लागलाय.. चांदीची पालखी चमकायला लागलीय… हे सगळं काम केलंय पिंपरीचे आपले मुस्लीम बांधव कमर अत्तार यांनी ! देहूतल्या देऊळवाड्यात कमरभैय्यांसोबत इम्रान शेख, उमर अत्तार, जाफर खान, शेहनाज आलम, अतिम बागवान हे सगळेच बांधव तल्लीन होऊन पालखी सजवायचं काम करत आहेत. अब्दागिरी, गरुडटक्के झळकवलेत… तुकोबारायांच्या पादुकांना आणि त्यांच्या पूजेच्या साहित्याला या सेवेकर्‍यांनी आनलेलं तेज पाहून डोळे दिपायला लागलेत. “तुकोबारायांची सेवा करताना आमाला लै खुशी होते. गेल्या सहा वर्षापासून ही संधी आम्हाला मिळतेय, त्यामुळे आम्ही स्वत:ला भाग्यशाली समजतो.” असं या कारागीरांचं म्हननं हाय.

रथावर आलेली काळसर पुटं त्यांनी जशी रिठा, लिंबू, चिंच, पावडरनं काढून टाकली आनि शुभ्र, लख्ख झळाळी आनली… तशी लोकांची जातीभेदानं-धर्मद्वेषानं काळवंडलेली मनं घासूनपुसून स्वच्छ करन्याचं साधन कुठलं आसंल, तर ते तुकोबारायांचे अभंग ! ते वाचनार्‍या मानसाला बहकवन्याचा दम कुठल्या व्हाॅटस् ॲप फाॅर्वर्डमधी नाय गड्याहो. आजच्या नासलेल्या भवतालात, “भेदाभेद भ्रम अमंगळ” हा तुकोबा माऊलीचा संदेश करेक्ट आनि परफेक्ट कळलेल्या वारकरी संप्रदायाचा आपल्याला लै म्हंजी लैच अभिमान हाय ! ❤️- किरण माने.


शेअर करा