‘ नंगानाच शुरु रहेगा ,’ उर्फी जावेदने ठणकावले : व्हिडीओ

शेअर करा

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद यांच्यात कपड्यांवरून चांगलाच वाद रंगला असून चित्रा वाघ यांना महिला आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली होती. उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रात हे असले प्रकार खपवून घेणार नाही असे म्हटले होते त्यानंतर जिथे कुठे ती भेटेल तिचे थोबाड फोडून काढेल असे देखील त्या म्हणाल्या होत्या. उर्फी जावेदने देखील त्यांना जोरदार प्रतिउत्तर देत हल्लाबोल केला होता.

सोशल मीडियावर सध्या तिचा मुंबई विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये एक छायाचित्रकार उर्फी हिला तुझ्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना तू काय सांगशील असे विचारतो त्यावेळी उर्फी म्हणते ‘ प्रेमाच माहित नाही पण माझा नंगानाच सुरूच राहील ‘ . तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक जणांनी तिच्यावर टीका केली आहे तर काही जणांनी तिच्या या धाडसाचे देखील कौतुक केलेले आहे.

उर्फी जावेद तिच्या चित्रविचित्र पोषाखामुळे चांगलीच चर्चेत आली असून तिची आगळीवेगळी फॅशन हा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झालेला आहे . चित्रा वाघ यांनी तिचा एक व्हिडिओ पाहिल्यानंतर महाराष्ट्रात हे काय चाललंय ? . असला नंगानाच तात्काळ बंद व्हायला हवा हवा असे सांगत पोलिसांकडे तिच्या विरोधात कारवाई साठी तक्रार देखील केली होती मात्र उर्फी हिने तोपर्यंत माझे प्रायव्हेट पार्ट दिसत नाहीत तोपर्यंत माझ्यावर नियमानुसार कुठलीही कारवाई होऊ शकत नाही असे ठणकावले होते.


शेअर करा