
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सिन्नर इथे काम धंदा शोधण्यासाठी आलेल्या कुटुंबातील महिलेला काम देण्याचे आमिष दाखवून अपहरण करून तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आला याप्रकरणी सिन्नर येथे दाखल होत अशा स्वरूपाचे रॅकेट कार्यरत असल्यास ते उध्वस्त करण्याची गरज आहे असे म्हटलेले आहे. त्यांनी पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या.
अत्याचारित महिला आणि तिच्या कुटुंबीयांसह चित्रा वाघ यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. पोलीस सदर प्रकरणी या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढतील असा देखील त्यांनी विश्वास व्यक्त केला असून आत्तापर्यंतच्या पोलिसांच्या कारवाईवर आपण समाधानी आहोत असेही त्यांनी म्हटलेले आहे. संपूर्ण राज्यात धर्मांतराचे मोठे रॅकेट कार्यरत असू शकते, असा देखील संशय त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे.
चित्रा वाघ यांनी याप्रकरणी बोलताना, ‘ आरोपी पास्टर याने तिच्या गळ्यातून मंगळसूत्र काढून तिला लाल रंगाचे पाणी पाजले आणि तुझे आता धर्मांतर झालेले आहे असे देखील तिला सांगितले. एक महिना महिलेला डांबून ठेवण्यात आलेले होते त्यावेळी त्या तिला मांसाहार शिजवण्यास सांगितले आणि जबरदस्तीने तो खाण्याच्या देखील आग्रह केला. महिलेने त्याला विरोध केला त्यानंतर तिला त्रास देण्यास सुरुवात करण्यात आली. तिचे धर्मांतरण , पीडित महिलेला डांबून ठेवणे, महिलेवर सामूहिक अत्याचार, विक्रीचा प्रयत्न या सर्व बाबी पाहता हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे देखील त्यांनी म्हटलेले आहे .
काय आहे प्रकरण ?
नगर येथील एका 35 वर्षीय महिलेला कामाला लावण्याचे तसेच धर्मांतराचे आमिष दाखवत एका व्यक्तीने तिला महिनाभर घरात डांबून तिच्यावर अत्याचार केलेले आहेत. सदर प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात स्वतःला फादर म्हणणाऱ्या एका व्यक्तीसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पीडित महिला ही नगर जिल्ह्यातील रहिवासी असून आपला पती आणि मुलांसह सिन्नर एमआयडीसी येथे कामाच्या शोधात गेलेली होती.
महिला, तिचा पती आणि तिचे तीन मुले हे कामाच्या शोधात सिन्नर औद्योगिक एमआयडीसी येथे पोहोचलेले होते त्यावेळी तिथे दोन महिलांनी त्यांच्याशी संभाषण केले आणि त्यानंतर त्यांना ‘ तुम्हाला काम देऊ ‘ असे सांगून आरोपी महिलेच्या घरी घेऊन गेले. तिथे भाऊसाहेब दोडके नावाचा ईसम आला आणि त्याने व इतर दोन महिलांनी या कुटुंबाला धर्मांतराचे आमिष दाखवले. कुटुंबीय अडचणीत असल्याने त्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि इतरत्र राहण्याची सोय नसल्याने ते तिथेच थांबले.
आरोपी महिलांच्या घरी राहुल नावाचा एक व्यक्ती आला त्याने आपण फादर आहोत असे सांगत लाल रंगाचे पाणी हे येशूचे रक्त आहे असे सांगत या महिलेला पाजले आणि त्यानंतर एक धार्मिक चित्र असलेले पुस्तक देखील तिला दाखवले. सदर घटना घडली त्याच दिवशी रात्री संशयित आरोपी भाऊसाहेब दोडके आणि राहुल तसेच इतर एका व्यक्तीने देखील या महिलेवर अत्याचार केला. सदर प्रकार कुठे बोलशील तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी देखील त्यांनी तिला धमकी दिली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सदर पीडित महिला ही पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने आरोपी महिला रेणुका यादव दोडके ( राहणार जोशी वाडी सिन्नर), प्रेरणा प्रकाश साळवे ( राहणार द्वारका नाशिक ), भाऊसाहेब यादव दोडके ( राहणार जोशी वाडी ), फादर राहुल लक्ष्मण आरणे ( राहणार गौतम नगर सिन्नर ) तसेच एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .