नगरमध्ये गुन्हेगारीचा ‘ सातबारा पॅटर्न ‘ , तीन जणांवर गुन्हे दाखल

शेअर करा

नगर शहर आणि परिसरात भूखंडाचे रेट दर हे वाढलेले असून अनेक बनावटगिरीची प्रकरणे समोर येत आहेत. असेच एक प्रकरण सध्या केडगाव इथे समोर आले असून केडगाव येथील एका भूखंडाची परस्पर विक्री करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे. सदर प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अंजेश्री महेश संचेती ( राहणार नवकार नगर विनायक नगर ), वसंत मनाजी कांबळे ( राहणार संकल्प बंगला नवजीवन कॉलनी सारसनगर ) आणि मनोज कुमार अशोकलाल बाफना ( महात्मा फुले चौक मार्केट यार्ड ) अशी गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे असून मंदा शंकर घुगे ( राहणार सावेडी ) यांनी संशयितांच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे.

मंदा घुगे यांनी फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे , 2000 साली त्यांनी केडगाव येथे तीन गुंठ्याचा भूखंड खरेदी केलेला होता आणि त्याचे पैसे देखील त्यांनी संबंधित व्यक्तीला दिले होते त्यानंतर त्या या भूखंडाचा नियमितपणे कर देखील भरत होत्या. त्यांचे पती मंगळवारी भूखंडाचा कर भरण्यासाठी केडगाव येथे गेल्यानंतर सदर भूखंड तुमच्या नावाने नाही असे त्यांना सांगण्यात आले त्यावेळी त्यांना धक्काच बसला. सदर प्रकरणात एजंट तसेच इतरही कोणी सहभागी आहे का याचाही पोलीस शोध घेत आहेत.

आपल्या भूखंडाची कोणी विक्री केली म्हणून त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय गाठले तेथे चौकशी केल्यानंतर सदर भूखंड हा अंजेश्री संचेती यांच्या नावावर असल्याचे समोर आले. सदर प्रकरणात योग्य ती चौकशी करण्यात यावी आपला भुखंड परस्पर विक्री करून आपले आर्थिक नुकसान केलेले आहे असा आरोप करत तीन जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नगर शहर आणि परिसरात अशा अनेक घटना याआधी देखील उघडकीला आलेले असून दुय्यम निबंधक कार्यालय व्यवस्थितरित्या व्यक्तींची शहानिशा करत नाही का ? असा देखील प्रश्न यामुळे उपस्थित झालेला आहे.


शेअर करा