नगर ब्रेकिंग..उड्डाणपुलाच्या पिलरवर पुन्हा ‘ पोस्टरबाज ‘, कारवाई कधी ?

शेअर करा

नगर शहरातील उड्डाणपुलाच्या पिलरवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास उलगडणारी अनेक चित्रे रेखाटण्यात आलेली आहेत. महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून प्रशासनाचा हा निर्णय कौतुकास्पद असला तरी या चित्रांचे पावित्र्य राखणे आव्हानात्मक बनू पहात आहे.

उड्डाणपुलाच्या एका पिलरवर याआधी देखील एका व्यक्तीकडून महाराजांच्या छायाचित्राच्या खाली त्याच्या व्यवसायाची जाहिरात चिटकवण्याचे काम करण्यात आले होते. या प्रकरणी कोतवालीत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आणि त्यानंतर हे पोस्टर काढून टाकण्यात आले. असाच प्रकार आता दुसऱ्यांदा घडलेला असून चांदणी चौक येथे असलेल्या एका पिलरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राच्या खाली एका धार्मिक कार्यक्रमाचे पोस्टर चिटकवण्यात आलेले आहे.

कार्यक्रम धार्मिक स्वरूपाचा असल्याने या पोस्टरवर अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही तसेच हे पोस्टर देखील काढून टाकण्यात आले नाही अशाच पद्धतीने भविष्यात देखील जर कार्यपद्धती राहिली तर ज्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपुढे मांडला जातोय त्या उद्देशालाच बाधा येत आहे.


शेअर करा