नगर शहरात आणखी दोन उड्डाणपुलाची मागणी , ‘ असा ‘ असेल मार्ग

शेअर करा

नगर शहरातील एकमेव उड्डाणपुलाचा मुहूर्त 19 नोव्हेंबर रोजी ठरलेला असून शहरातील पहिल्यावाहिल्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी हे नगर शहर दौऱ्यावर येणार असून या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषद घेत नगरमध्ये आणखी दोन उड्डाणपूल उभारण्याची मागणी केलेली आहे. किरण काळे यांनी या दोन पुलांचा नियोजित आराखडा देखील सादर केलेला आहे.

पत्रकार परिषदेत किरण काळे म्हणाले की, शहरातील वाहतूक समस्या पाहता आणि नागरिकांची गरज लक्षात घेता सक्कर चौकपासुन अशोका हॉटेल चौक या उड्डाणपुलाला उड्डाणपूल एक असे म्हणता येईल तर शहरासाठीच्या उड्डाणपूल दोन आणि तीनची कामे तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. या दोन्ही उड्डाणपुलाचा नियोजित आराखडा आम्ही तयार केलेला असून नितीन गडकरी यांना तो पाठवलेला देखील आहे. उड्डाणपूल २. ० हा न्यू आर्टस् कॉलेज ते सक्कर चौक असा असून या मार्गावर विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ देखील असते तर नागरिकाची देखील मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. शाळा-कॉलेज भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेला दररोज ट्राफिक जाम होत असून या रस्त्यावर उड्डाणपुलाची नितांत गरज आहे.

उड्डाणपूल ३.० हा जाधव पेट्रोल पंप नेप्ती नाका या रस्त्यावर करण्याची करण्यात यावा अशी आमची मागणी आहे कारण सीना नदीला सातत्याने पूर येत असल्याने जुना पूल पाण्याखाली जातो त्यामुळे शहराशी नागरिकांचा संपर्क पूर्णपणे तुटतो. सदर उड्डाणपूल हा बाराशे मीटर अंतराचा असून गेल्या काही वर्षांत अनेक नागरिकांनी नगर शहरापासून सीना नदीच्या पलीकडे कल्याण रोडवर आपला रहिवास केलेला आहे. या ठिकाणी लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे मात्र पूर आल्यानंतर या नागरिकांचा संपर्क शहराशी तुटत असल्याने या रस्त्यावर देखील उड्डाणपुलाची मोठ्या प्रमाणात गरज आहे.


शेअर करा