नगर हादरलं..मुलींच्या चपला तरंगताना दिसताच आई घरी आली अन ..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नगर जिल्ह्यात समोर आलेली असून अकोले तालुक्यातील मन्याळे गावात एकाच कुटुंबातील आई आणि दोन मुलींनी आत्महत्या केलेल्या असून सदर घटनेची पोलिसात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आलेली आहे. घटना उघडकीला आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून घरगुती वादातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे .

उपलब्ध माहितीनुसार, सुनिता अनिल जाधव ( वय 50 ) , शितल अनिल जाधव ( वय 22 ), प्राजक्ता अनिल जाधव ( वय 19 ०) अशी मयत आई आणि मुलींची नावे असून आई आणि मुलींमध्ये घटना घडली त्या दिवशी किरकोळ वाद झालेला होता. रागाच्या भरात दोन्ही मुली गावातील वापरात नसलेल्या या विहिरीकडे गेल्या त्यानंतर आई देखील त्यांच्या पाठोपाठ गेली त्यावेळी विहिरीच्या काठावर विहिरीच्या पाण्यावर मुलींच्या चपला पाण्यात तरंगताना दिसून येताच सुनीता या धावत आपल्या घरी आल्या आणि त्यांनी राहत्या घरी दोरखंडाने गळफास घेतला.

सदर घटनेची माहिती समजताच अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि विहिरीतील संपूर्ण पाणी उपसून काढून दोन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. सदर विहिरीत याआधी देखील अशाच स्वरूपाच्या घटना घडल्याने आणि या विहिरीचा वापर कोणी करत नसल्याने ही विहीर बुजवून टाकण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे .


शेअर करा