नमस्कार सर.., चोराच्या दोन पानांच्या लेटरने दुकानदाराचे डोळे पाणावले

शेअर करा

दुकान फोडल्यानंतर चोर हाती मिळेल ती गोष्ट येऊन चोर पलायन करतात मात्र या पार्श्वभूमीवर सोशल मीडियात सध्या एका चोराची जबरदस्त चर्चा सुरू असून राजस्थान येथील जैसलमेर येथील ही घटना आहे. एका मिठाईच्या दुकानात जैसलमेर इथे चोराने चोरी केली मात्र तरी देखील दुकान मालक यांनी या संदर्भात कुठलीही तक्रार दिली नाही कारण चोराने चोरी केल्यानंतर जे काही दोन पानांचे पत्र लिहिले होते ते वाचून दुकान मालक यांना तक्रार द्यावीशी वाटली नाही उलट त्यांचे डोळे पाणावले.

चोर अनेकदा चोरी करतेवेळी कुटुंबीयांना मारहाण करतात तसेच जर घरी कोणी नसेल आणि जर काही मिळाले नाही तर घरात घाण करून जातात तसेच भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहून जातात मात्र या चोराने दुकानात चोरी केल्यानंतर जो काही मजकूर लिहून ठेवला तो वाचून दुकान मालकाचे देखील डोळे पाणावले. भूक लागली असल्याने आपण मिठाईच्या दुकानात घुसलेलो होतो त्यानंतर आपण मिठाई खाल्ली आणि दुकानदार यांच्यासाठी दोन पानांचे पत्र लिहिले असे या चोराने म्हटलेले आहे सोबतच आपल्याला चोर म्हणू नका ‘ अतिथी ‘ म्हणा असा देखील लाडका आग्रह त्याने या पत्रात केलेला आहे.

काय आहे चोराने लिहलेला मजकूर ?

नमस्कार सर मी एक चांगल्या मनाचा माणूस आहे. मी तुमच्या दुकानात चोरी करण्यासाठी नाही तर माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रवेश केलेला आहे. मी तुमच्या दुकानात फक्त खाण्यासाठी प्रवेश केलेला असून मी कालपासून काहीही खाल्लेले नाही त्यामुळे मला भूक लागलेली आहे म्हणून तुमच्या दुकानात मी पैशासाठी नव्हे तर माझी भूक भागवण्यासाठी आलेलो आहे.

तुम्ही गरीब आहात हे मला देखील माहिती आहे म्हणून तुम्हाला दिलासा देण्यासाठी मी हे पत्र लिहीत आहे. तुमच्या दुकानात प्रवेश करताना माझ्या पायाला दुखापत झालेली आहे म्हणून या उपचारासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील म्हणून तुमच्या दुकानातला पैशाचा गल्ला मी घेऊन जात आहे. मी तुमच्या दुकानातल्या पांढऱ्या रंगाच्या मिठाईचे दोन तुकडे आणि आग्रा पेठ्याचे दोन तुकडे खाल्लेले आहेत. तुमच्या दुकानात ठेवलेली शेव मला सापडली नाही.मला एक शेवटची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की तुम्ही पोलिसांना कॉल करू नका ते माझे काही नुकसान करू शकणार नाही उलट तुमच्याकडून पैसे घेतील उलट तुम्ही माझी एवढी सेवा केली म्हणून आयुष्यभर मी तुमचा ऋणी राहणार आहे.


शेअर करा