
एका पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ते आणि नेते पवन खेडा यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी असे म्हणण्याऐवजी ‘ नरेंद्र गौतमदास ‘ असे म्हटलेले होते त्यानंतर त्यांनी त्यांची चूक दुरुस्तही केली मात्र नरेंद्र गौतमदास हा शाब्दिक फटका भाजपला चांगलाच जिव्हारी लागलेला असून आसाम पोलिसांनी या प्रकरणी मोदी यांची बदनामी झाल्याचा दावा करत त्यांना गुरुवारी दिल्ली विमानतळावर अटक केलेली आहे.
काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख असलेले पवन खेडा हे रायपूर येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सहभागी होण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना विमानातून अटक केली आणि त्यांच्या त्यानंतर तात्काळ पवन खेडा यांनी अटकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली 28 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामिनावर त्यांची सुटका करण्यात आलेली असून त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने तिथेच धरणे धरलेले पहायला मिळाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख करताना पवन खेडा यांनी नरेंद्र दामोदरदास ऐवजी नरेंद्र गौतमदास असे म्हटलेले होती त्यानंतर त्यांनी दुरुस्ती देखील केली मात्र पत्रकारांमध्ये देखील त्यांच्या या चुकीनंतर हशा पिकला आणि त्यामुळे भाजपला हा फटका चांगलाच जिव्हारी लागला आणि त्यानंतर ही घटना घडली त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली . मोदी यांनी आतापर्यंत गांधी परिवारावर अनेकदा खालच्या भाषेत टीका केलेली असून यंत्रणा त्यावेळी मात्र सक्रिय असल्याचे दिसून आले नाही .