नरेंद्र मोदींचे ‘ परममित्र ‘ पुन्हा अडचणीत , आणखीन एक अहवालातून पोलखोल

शेअर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परममित्र असलेले गौतम अडाणी यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. गोदी मीडिया एकीकडे या प्रकरणावर मूग गिळून गप्प आहे तर दुसरीकडे गौतम अडाणी यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. अमेरिकन रिसर्च फॉर्म हिंडेनबर्ग अहवालानंतर आता ऑर्गनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट या संस्थेने देखील अडाणी समूहाच्या कंपन्यांवर समूहाच्या कंपन्यांवर धक्कादायक आरोप केलेले आहेत .

मॉरिशस फंडिंगच्या माध्यमातून सार्वजनिकरित्या ट्रेड केल्या गेलेल्या शेअरमध्ये लाखो रुपये गुंतवल्याचा आरोप ओसीसीआरपी यांच्याकडून करण्यात आलेला असून धक्कादायक बाब म्हणजे स्वतःच्याच शेअरची किंमत वाढावी म्हणून अडाणी समूहाच्याच हस्तकांकडून हा प्रकार करण्यात आलेला आहे, असाही यात ठपका ठेवण्यात आलेला आहे . अहवालात म्हटल्याप्रमाणे 2013 पासून 2018 पर्यंत अडाणी समूहाच्याच कंपन्यांनीच त्यांचेच शेअर गुप्तपणे खरेदी केले.

ओसीसीआरपी हे शोध पत्रकारांचे जागतिक नेटवर्क असून 2006 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली होती. अडाणी समूहाच्या पब्लिक लिमिटेड कंपनीमधील सार्वजनिक क्षेत्रात जे काही शेअर्स आहेत या शेअर्समधील गुंतवणूक ही अडाणी समूहाच्याच हस्तकांकडून करण्यात आलेली होती आणि हे हस्तक अडाणी कुटुंबातीलच एका व्यक्तीच्या इशाऱ्यावर काम करत होते. ज्याच्या माध्यमातून अडाणी शेअर्सची किंमत जाणीवपूर्वक एक वातावरण निर्मिती करून कृत्रिमरित्या वाढवण्यात आलेली होती असा या संस्थेने आरोप केलेला आहे.


शेअर करा