नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांची प्राणज्योत मालवली

शेअर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांना प्रकृती बिघडल्याने दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झालेला असून त्यांच्या मृत्यूनंतर राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. गांधीनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून विविध राजकीय नेते यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रात देखील त्यांच्या मृत्यूनंतर अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केलेला असून पंतप्रधान मोदी यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असे म्हटलेले आहे . राहुल गांधी यांनी देखील यासंदर्भात एक ट्विट केलेले असून त्यामध्ये, ‘ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की माताजी, श्रीमती हीरा बा के निधन का समाचार अत्यंत दुःखद है। इस मुश्किल समय में, मैं उन्हें और उनके परिजनों को अपनी गहरी संवेदनाएं और प्यार व्यक्त करता हूं। ‘ असे म्हटलेले आहे.


शेअर करा