नवरा बायकोच्या मारामारीत 1833 ची बाल्कनी खाली अन. : पहा व्हिडीओ

शेअर करा

नवरा बायको म्हटलं की किरकोळ स्वरूपाची भांडणे आलीच मात्र काही कालावधीत ही भांडणे सौम्य होऊन जातात आणि पुन्हा नवरा बायको सुखाने नांदू लागतात. ज्यावेळी भांडण होते त्यावेळी कधीकधी हाणामारी देखील होते आणि त्यातून गुन्हे देखील घडतात मात्र रशियामध्ये एक वेगळाच प्रकार समोर आलेला असून नवरा बायकोच्या भांडणात एक बाल्कनी मोडली असून ही बाल्कनी खाली पडली आणि त्यानंतर हे जोडपे देखील खाली पडले. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून भांडणात खाली पडलेली बाल्कनी ही तब्बल 1833 सालची असून ऐतिहासिक वारसा असलेल्या या बाल्कनीचे नुकसान झालेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, ओल्गा वोल्कोवा आणि एव्ह्गेंनी कार्लागीन असे या दाम्पत्याचे नाव असून हे दोघे रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे राहतात. त्यांच्यात एका गोष्टीवरून भांडण सुरू झाले आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. भांडण करत असताना दुसऱ्या मजल्यावर असलेल्या घराच्या बाल्कनीत ते आले आणि त्यानंतर बाल्कनीवर रेलून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला त्यात बाल्कनीसोबत ते देखील खाली आले.

सदर जोडप्याचे घर हे रस्त्यावर असून रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने त्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ शूटिंग केला आणि त्यानंतर सोशल मीडियावर शेअर केला. सदर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला असून बाल्कनीची रेलिंग तोडून 25 फूट खाली फुटपाथवर ते कसे पडले ते या व्हिडिओत देखील दिसते आहे. दोघांचेही पाय फ्रॅक्चर झालेले असून त्यांच्या वादामागचे कारण काय होते हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही मात्र रशियाने ऐतिहासिक वारसा गमावलेला आहे.


शेअर करा