नवरी प्रियकरासोबत फरार झाली पण जाताना ‘ असा ‘ संदेश चिटकवून गेली की ..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून घरच्यांनी लावून दिलेले लग्न मान्य नसल्याकारणाने हळद फेडण्यासाठी म्हणून माहेरी आलेली नवरी प्रियकरासोबतच गायब झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पैठण येथील ही घटना असून आपण आपल्याला कोणी पकडू नये म्हणून तिने जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याजवळ दुचाकीवर आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवलेली होती त्यानंतर पोलिसांनी सदर तरुणी आणि तिच्यासोबतच्या तिच्या प्रियकराचा शोध सुरू केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर मुलगी ही पैठणी एमआयडीसी परिसरात राहत असून तिचा तीन दिवसांपूर्वीच विवाह झालेला होता. हळद फेडण्यासाठी म्हणून ती माहेरी आली मात्र पिंपळवाडी येथील एक तरुणासोबत तिचे प्रेम संबंध होते त्यातून तिने हे लग्न मनाविरुद्ध होत असल्याचे देखील घरच्यांना सांगितले होते मात्र घरच्यांनी तिचे काही एक ऐकून घेतले नाही म्हणून अखेर तिने फरार होण्यासाठी पूर्णपणे प्लॅन बनवलेला होता.

संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ती तिच्या प्रियकरासोबत पैठण ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर डाव्या कालव्याजवळ आली आणि मोटरसायकल उभी करून मोटरसायकलला चिठ्ठी लावून आम्ही आत्महत्या करत आहोत असे लिहून ठेवलेले होते. आमच्या मृत्यूला कोणाला जबाबदार धरू नये असे देखील दिले म्हटलेले होते. पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी मोटार सायकल आणि गाडीला लावलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली .

प्रत्यक्षदर्शी व्यक्तींनी मोटारसायकल कालव्यावर लावून ते दोघे रिक्षाने पैठणकडे गेलेले आहेत असे सांगितल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांचा तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांचा शोध सुरू केलेला असून आत्महत्येची चिठ्ठी लावून ते फरार झाल्याचे आतापर्यंत समोर आलेले आहे. पळून गेलेली नवरी आणि तिच्यासोबत असलेला तिचा प्रियकर दोघेही अल्पवयीन असून घरातून बाहेर पडल्यानंतर तिच्या प्रियकराने एटीएममधून मोठी रक्कम काढली होती तर नवरीने तिचे आधारकार्ड देखील घरातून घेऊन पलायन केलेले आहे. पोलीस त्यांचा सध्या शोध घेत असून वृत्त लिहीपर्यंत ते हाती आलेले नाहीत .


शेअर करा