नवऱ्याची दारू सुटेना , बायकोनेही फोडली बाटली अन ..

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका महिलेची जोरदार चर्चा सुरू असून आपल्या पतीचे दारूचे व्यसन सोडण्यासाठी या महिलेने त्याला त्याच पद्धतीने धडा शिकवलेला आहे. आग्रा येथील हे प्रकरण असून दारूची नशा सोडवण्यासाठी पत्नीने चक्क कोणीही विचार करू शकणार नाही असा प्रकार केला.

महिलेने दिलेल्या माहितीप्रमाणे तिचा पती हा कायम मद्यधुंद अवस्थेत घरी येत असायचा अनेकदा त्याला सांगितल्यानंतर देखील त्याच्यात बदल झाला नाही उलट तो भांडण उतरून काढायचा आणि त्यानंतर आमच्यात सातत्याने वाद होत होते व त्याला सांगून फरकच होत नव्हता हे लवकरच आपल्या लक्षात आले म्हणून त्याला त्याच पद्धतीने उत्तर देण्याचा आपण निर्णय घेतला.

महिलेने त्यानंतर आपण स्वतः देखील रोज दारू पित आहोत असे नाटक करायला सुरुवात केली आणि त्यानंतर आपली बायको देखील मद्यधुंद अवस्थेत पाहिल्यानंतर या पतीला धक्काच बसला. आपली पत्नी दारू कशी पिऊ शकते असा प्रश्न त्याला पडला आपल्याप्रमाणे पत्नी देखील आता दारूच्या आहारी गेलेली आहे हे लक्षात आल्यानंतर हा पती कुटुंबाच्या समुपदेशन केंद्रात पोहोचला त्यावेळी दोघांनीही एकमेकांवर दारूच्या आहारी गेल्याचा आरोप केला.

महिलेने यावेळी आपण पतीला घाबरवण्यासाठी हा प्रकार करत होतो असे सांगितले सोबतच तिने समुपदेशन केंद्रात अत्यंत उत्तम असा अभिनय देखील करून दाखवला. पतीने समुपदेशक असलेल्या व्यक्तीच्या समोर आता आपली दारू सुटतच नाही याची स्पष्ट कबुली देत निदान आपण आठवड्यातून एकदा दारू पिऊ मात्र इतर वेळी दारू पिणार नाही असे लेखी लिहून दिले आणि आपण आपल्या पत्नीसोबत वाद घालणार नाही असे देखील त्याने आश्वासन दिलेले आहे.


शेअर करा