‘ नागालँडची पाटलीन ‘ असलेल्या या जोडप्याची लव्हस्टोरी नक्की काय ?

शेअर करा

एक दुजे के लिए चित्रपटांमध्ये देखील हिंदी भाषिक तरुणी तमिळ भाषिक तरुणाच्या प्रेमात पडल्याचे तुम्ही पाहिले असेल. असाच काहीसा प्रकार जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील सावखेडासिम इथे घडला आहे. नागालँडमध्ये एका समारंभात जळगावचा तरुण गेला असताना तेथील तरूणी ही मराठी मुलाच्या प्रेमात पडली आणि त्यानंतर दोन्ही नागालँड धर्म पद्धतीने विवाहबध्द झाले असून तरूणी सावखेडासिम येथे संसार करण्यास आली आहे .

सावखेडासिम गावातील रहिवासी समाधान युवराज पाटील हा तरूण गोव्यातील पणजी येथे नोकरीला आहे. तो एका कार्यक्रमासाठी सहकारी कर्मचाऱ्यासोबत बोरपदार तहसिल दिमापुर नागालँड येथे गेला होता तेव्हा त्याची ओळख प्रिया दिलीप पाउल या तरुणीशी झाली आणि त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. समाधान यांनी प्रियासोबत नागालँडच्या धर्मपद्धतीनुसार विवाह केला व आता पुन्हा हिंदू पद्धतीने तिच्याशी रेशीमगाठ बांधली आहे. तरूणीस मराठी कळत नसुन हिंदी भाषा देखील खूप कमी समजते.


शेअर करा