
नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक धर्मनिष्ठ हिंदू होते मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार अत्यंत वेगळे असून त्यांचा कुठलाही मेळ नाही असे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी कोलकत्ता इथे म्हटलेले आहे.
अनिता बोस या सध्या जर्मनी येथे राहत असून कोलकत्ता येथे आलेल्या होत्या त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलेले असून त्यामध्ये, ‘ नेताजी आणि काँग्रेस यांच्या विचारात बरीचशी समानता आहे. नेताजी धर्मनिष्ठ हिंदू होते मात्र इतर धर्मांचा आदर करण्यावर त्यांचा विश्वास होता. भाजप आणि आरएसएस यांच्या विचारात हे कुठलेच प्रतिबिंब दिसत नाही. त्यांनी हे प्रतिबिंब दाखवावे असे आवश्यकही नाही मात्र नेताजींचे विचार आणि आरएसएस संघाचे विचार हे वेगवेगळ्या ध्रुवावर आहे ‘, असे देखील त्यांनी ठणकावले आहे .