
नेवासा : शहरातील मुख्य बाजार पेठेतील व्यापाऱ्याकडून काल दि.१७ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास नेवासा पोलिसांनी गावठी कट्यासह ९ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत याबाबत पो. कॉ.रामदास वैद्य यांनी दिलेल्या खबरीवरून पो.नि.विजय करे यांनी पो.हे.कॉ.तुळशीराम गिते, पो.ना दहिफळे, पो.कॉ.श्याम गुंजाळ व पोकों रामदास वैद्य यांना दिलेल्या सूचनेनुसार ते तात्काळ घटनास्थळी पोहचले असता लताबाई किशोर कुंभकर्ण रा औंदुबर चौक यांना त्याचा मुलगा सागर किशोर कुंभकर्ण हा त्यांना व त्यांची सुन प्रांजल तसेच नात श्रेषा, माही, श्रावणी या सर्वांना विनाकारण लाथाबुक्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत आहे असे सांगितले आहे तरी तुम्ही सदर ठिकाणी जावून सदर पिडीत महिला व सदर इसमास घेवून पोलीस स्टेशनला या व त्याचेवर कायदेशीर कार्यवाही करा असे आदेश पो.नि.विजय करे यांनी दिल्याने पोहेका गिते, पोना दहिफळे पोको शाम गुंजाळ, . पोकों वैदय असे सरकारी गाडीने सदर ठिकाणी गेले असता सदर ठिकाणी सागर कुंभकर्ण यास ताब्यात घेतले व त्याची आई लताबाई यांना तक्रार देण्यास पोलीस स्टेशनला येण्यास कळविले.
पोलीस स्टेशन नेवासा येथे आल्यानंतर पोनि सो विजय करे यांनी सागर किशोर कुंभकर्ण यास विश्वासात घेवुन त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने पोलीसांना सांगितले की मला माझी आई, पत्नी व मुली हे कायम त्रास देतात मी त्यांचा कायमचा काटा काढण्यासाठी एक गावठी कट्टा व जिवंत काडतुसे विकत घेतलेले असुन त्यांना मी ठार मारणार आहे. सदर गावठी कटटा व जिवंत काडतुसे मी माझे घराचे तिस-या मजल्यावरील कपाटात लपवुन ठेवलेली आहेत असे सांगितले.
पो. नि करे, पोहेकॉ गिते, पोना दहिफळे. पोका/ शाम गुंजाळ, पोकों वेदय व इसम नामेसागर किशोर कुंभकर्ण असे सर्वजण सरकारी गाडीने त्याचे राहत्या घरी गेले असताना पोहेकॉ गिते यांनी दोन पंचांना बोलावून त्यांना सागर कुंभकर्ण याने सांगितल्याप्रमाणे त्याचे घराचे तिस-या मजल्यावरील बेडरुमध्ये एक गावठी कटटा व जिवंत काडतुसे काढून देतो असे सांगितले त्याप्रमाणे पंचनामा लिहून देणेस कळविले वरुन सदर पंचांना बरोबर घेवून आम्ही पोलीस स्टाप सागर अशोक कुंभकर्ण याने आम्हांला त्याचे घराचे तिस-या मजल्यावरील बेडरुमध्ये रात्री ११/०० वाजचे सुमारास घेवुन गेला सदर ठिकाणी त्याने त्याचे लाकडी कपाटामधील ड्रॉवर मधून एक गावटी कटटा व ९ जिवंत काडतुसे काढून दिल्याने लागलीच दोन पंचासमक्ष जप्त करुन त्यानंतर पोलीस कॉन्सटेबल श्याम बाबासाहेब गुंजाळ यांच्या फिर्यादवरुन इसम नामे सागर अशोक कुंभकर्ण याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्ह्यांत सागर अशोक कुंभकर्ण याला अटक करण्यांत आलेली आहे…
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला सो, अहमदनगर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो श्रीम. स्वाती भोर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप मिटके उपविभाग शेवगांव यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि श्री. विजय करे, पोहेकॉ तुळशीदार गिते, पोना / प्रतापसिंह दहिफळे, पोको शाम गुंजाळ, पोकों/रामदास वैद्य यांनी केली असुन पुढील तपास पोहेकॉ तुळशीराम गिते करीत आहेत.