‘ पंकज सिर्फ एक बार बात कर लो ‘ , विवाहित महिलेने घेतला गळफास

शेअर करा

देशात एक खळबळजनक अशी घटना बिहारमधील पाटणा येथे उघडकीला आली असून प्रियकराच्या प्रेमात आंधळे झालेल्या एका महिलेने आपल्या प्रियकराला .. ‘ ….बस एक बार बात करलो ‘ अशी विनंती करत अखेर गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. मृत्युपूर्वी तिने स्वतःचा एक व्हिडिओ बनवला असून मुजफ्फरपूर येथील हे प्रकरण आहे.

सदर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला असून महिला साडीचा फास गळ्यात लावलेली आढळून येत आहे. फाशी घेण्यापूर्वी प्रियकराला आपल्या सोबत एकदा बोलण्याची विनंती करताना ती दिसत असून नीतुदेवी असे तिचे नाव असल्याचे समजते. 7 ऑक्टोबर रोजी हे प्रकरण घडलेले असून महिलेचे गावातील पंकज नावाच्या एका युवकावर प्रेम होते. सदर महिला ही विवाहित असून प्रियकराचे आणि तिचे भांडण झाल्यानंतर तिने हा प्रकार केलेला आहे .

मिळालेल्या माहितीनुसार, नीतूचा विवाह 12 वर्षांपूर्वी रद्दी व्यापारी बिंदेश्वर शाहसोबत झाला होता. त्यांना 3 मुले आहेत.या महिलेचे गावातीलच पंकज नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली त्यामुळे पती संतापला होता. पोलिसांच्या चौकशीत महिलेच्या मुलांनी याला दुजोरा दिला आहे.

नीतू देवी यांच्या आत्महत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, तिने स्वत: साडीचा फास बनवला आणि पंख्यावरुन झोका घेतला. याआधीही त्यांनी आपल्या मुलीला सोनालीला अनेकदा फोन केला पण 7 वर्षांची सोनाली सतत मोबाईल पाहत राहिली. मुलीला काही समजेल तोपर्यंत नीतू देवी फासावर लटकत होती. नीतू ओरडली तेव्हा सोनालीने आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना बोलावले.


शेअर करा