
सध्या शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा पठाण चित्रपट वादात सापडलेला असून असून त्यातील एका गाण्यात दीपिका पदुकोन हिने भगव्या रंगाची बिकिनी घातली म्हणून तिच्यावर केली जात आहे तसेच या चित्रपटावर बहिष्काराचे देखील आवाहन केले जात आहे.
हनुमान गडी येथील महंत राजू दास यांनी या प्रकरणावर बोलताना, ‘ ज्या थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवला जाईल ते पेटवून देण्यात यावे. बॉलिवूड आणि हॉलिवूड हे सतत सनातन धर्माची बदनामी करतात आणि संस्कृतीची खिल्ली उडवतात म्हणून या चित्रपटावर बहिष्कार देखील घेण्यात यावा. शाहरुख खान हा सनातन धर्माच्या संस्कृतीची अनेकदा खिल्ली उडवतो म्हणून त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार घालावा, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.