
महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरजवळ असलेल्या शिऊर इथे समोर आले असून एका सेफ्टी टँकमध्ये 25 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. सदर प्रकारानंतर चांगलीच खळबळ उडाली मात्र पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आले आहे. सुरुवातीला या प्रकरणात पती आणि सासूच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला होता मात्र अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे .
उपलब्ध माहितीनुसार, माया आगलावे असे या 25 वर्षीय महिलेचे नाव असून तिचा पती असलेला दादासाहेब हा हातमजुरी करतो तर माया ही गावात बचत गटाचे काम करत होती. पती दादासाहेब याने सासूला फोन करून माया गायब असल्याचे सांगितले त्यानंतर तिची आई विठाबाई कराळे हिने सासरी धाव घेतली आणि तपास करत असताना तिचा मृतदेह घरामागील सेफ्टी टँकमध्ये आढळून आला. पती आणि सासू पैशासाठी तिचा छळ करत होते अशी फिर्याद तिच्या आईने पोलिसात दिली त्यानंतर पोलिसांनी दादासाहेब आणि त्याच्या आईला ताब्यात घेतले होते.
सुरुवातीपासून दादासाहेब याने मी तिचा खून केला नाही असा विचारही कधी आमच्या डोक्यात आला नाही असे सांगत होता मात्र पोलिसांचा त्यावर विश्वास बसत नव्हता. पोलिसांनी मयत महिला हिचे कॉल रेकॉर्ड चेक केले त्यावेळी ती एका व्यक्तीसोबत सतत बोलत असल्याचे दिसून आले आणि त्या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर हा तरुण तिचा चुलत दीर असण्याचे समोर आले. त्याचे तिच्यासोबत अनैतिक संबंध होते आणि ती त्याला पैसे मागत असायची. पैसे दिले नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी देखील ती म्हणायची म्हणून आपण तिला संपवले असे या तरुणाने म्हटले आहे.
ज्ञानेश्वर बबन आगलावे असे आरोपी तरुणाचे नाव असून तो मयत महिलेचा प्रियकर असल्याचे समोर आले आहे. ज्ञानेश्वर याचे सहा महिन्यापासून मायासोबत अनैतिक संबंध होते त्यामुळे ती त्याच्याकडे सतत पैशाची मागणी करत होती. जर तू पैसे दिले नाही तर तुला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेल असे सांगत ज्ञानेश्वर याच्याकडे 20 हजार रुपयांची मागणी केली होती. ज्ञानेश्वर तिच्या घरी आला आणि त्याने आपल्याकडे पैसे नाहीत असे सांगितले त्यावरून वाद झाल्यानंतर त्याने मायाची हत्या केल्याचे समोर आले आहे तर पती आणि सासू यांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.