पती मिसिंग असल्याची फिर्याद दिली अन ‘ मास्टरप्लॅन ‘ रचला , गुजरातमधून बेड्या

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना वसई येथे समोर आलेली असून वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मृतदेह आढळून आला होता त्यात मयत पतीच्या हत्येची सुपारी चक्क त्याच्या पत्नीनेच दिल्याचे समोर आलेले आहे. पोलिसांनी याप्रकरणी मयत व्यक्तीच्या पत्नीसह शेजारी राहणाऱ्या एका दांपत्याला गुजरात येथून बेड्या ठोकलेल्या आहेत. वसईच्या नायगाव परिसरात पोलिसांना एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आलेला होता त्यानंतर त्याचे नाव कमरुद्दिन उस्मान अन्सारी असे असल्याचे समोर आले.

कमरूदीन उस्मान अन्सारी हे त्यांची पत्नी असलेल्या आशिया अन्सारी हिच्यासोबत मुंबईतील गोरेगाव पूर्व येथे एका चाळीत राहत होते तर त्यांची पत्नी एका कंपनीत कामाला जात होती. शेजारी राहणारे पती-पत्नी असलेले बिलाल पठाण आणि सोफिया पठाण यांना आशिया अन्सारी हिने आपल्या पतीला ठार मारण्याची सुपारी दिलेली . आरोपी दांपत्याने एक लाख रुपयांची ही सुपारी घेतली आणि त्यानंतर वसईजवळील नायगाव परिसरात कमरुद्दिन यांना घेऊन जात यांची अमानुषपणे हत्या केली आणि त्यांचा मृतदेह खाडीत फेकून दिला. धक्कादायक बाब म्हणजे आशिया अन्सारी हिने त्यानंतर काही तासातच आपला पती बेपत्ता असल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिलेली होती.

पोलीस तपास करत असतानाच 27 जानेवारी रोजी वालीव पोलिसांना हा मृतदेह सापडल्यानंतर परिसरातील पोलीस ठाण्यांना याप्रकरणी माहिती देण्यात आली आणि अखेर मृतदेहाची ओळख पटली अन त्यानंतर पोलिसांनी त्याचे घर गाठले त्यावेळी त्याची पत्नी हिच्या बोलण्यात पोलिसांना संशय आढळून आला. शेजारी राहणारे दाम्पत्य हे फिर्याद आल्यापासून फरार असल्याची देखील माहिती समजली. पोलिसांनी तात्काळ त्यानंतर गुजरात गाठले आणि या दाम्पत्याला ताब्यात घेतले त्यावेळी त्यांनी या हत्येची सुपारी आशिया अन्सारी अर्थात मयत व्यक्तीची पत्नी हिनेच दिल्याचे कबुल केले आहे.

मयत अन्सारीची पत्नी आशिया हिचे कंपनीत सोबत काम करणाऱ्या एका पुरुषासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधात पती अडथळा ठरत असल्याने तिने शेजारी राहणाऱ्या बिलाल उर्फ मुल्ला निजाम पठाण आणि सोफिया बिल्ला पठाण यांना हत्येची सुपारी दिली आणि त्यांनी हा खून केला. पतीची हत्या करण्यासाठी आशियाने एक लाख रुपये देऊ केले होते अन त्यातील 20 हजार रुपये अॅडव्हान्स देण्यात आले होते. पोलिसांनी तिघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.


शेअर करा