पत्रकारांनी फक्त भाजपचे गुणगाण गायचे ही अपेक्षा आहे का ? , सर्वच थरातून संताप

शेअर करा

गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारला प्रश्न विचारले की पत्रकारांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रकरणे समोर येत असतानाच महाराष्ट्रात देखील त्याच धर्तीवर काम सुरू असल्याची टीका सर्व थरातून केली जात आहे. लोकशाही मराठी चॅनलचे संपादक असलेले कमलेश सुतार यांच्याविरोधात देखील किरीट सोमय्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अनेक राजकीय नेत्यांनी याविषयी राज्य सरकारच्या सूडबुद्धीबद्दल संताप व्यक्त केलेला आहे .

किरीट सोमय्या यांची एक क्लिप काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेली होती त्यानंतर ही क्लिप लोकशाही चॅनलने जशीच्या तशी दाखवली म्हणून लोकशाही मराठी चॅनेलचे संपादक असलेले कमलेश सुतार यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील पत्रकारांवरील कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे. राज्य सरकारने हीच तत्परता बारसू प्रकरणात का दाखवली नाही ? असा खडा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, पत्रकारांनी फक्त भाजपचे गुणगान गायचे हे राज्य सरकारला अपेक्षित आहे का ? भाजपची ही दादागिरी, सत्तेची मस्ती आणि मुस्कटदाबी अती होतंय…राज्यातील जनतेचा जीव कोंडू लागला आता ! असे ते म्हणाले.

‘ जशीच्या तशी ‘ बातमी स्पष्टपणे दाखवली म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आता जशीच्या तशी बातमी दाखवणे म्हणजे काही गुन्हा ठरतो आहे का ? असा देखील संतप्त सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात असून जालन्यात मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्जनंतर राज्य सरकारच्या मनमानी कारभाराचे आणखीन एक उदाहरण म्हणून हा प्रकार समोर आलेला आहे. किरीट यांच्या तक्रारीनंतर संपादक कमलेश सुतार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत असून सर्व स्तरातून या प्रकाराबद्दल निषेध व्यक्त केला जात आहे.


शेअर करा