पाकिस्तानला देखील हिंदू राष्ट्र बनवू , बागेश्वरबाबाचा मास्टरप्लॅन ऐकालं तर..

शेअर करा

महाराष्ट्रात दिव्यशक्ती ( दैवी शक्ती नव्हे ) सिद्ध करण्याचे आव्हान दिल्यानंतर पळ काढणारा बागेश्वर बाबा याने एक नवीन विधान केलेले असून गुजरातमध्ये सध्या हा बाबा दिव्यदरबार घेत आहे. सुरतमध्ये धीरेंद्र कृष्णशास्त्री महाराज अर्थात बागेश्वर बाबा याने हिंदु राष्ट्राबद्दल एक वक्तव्य केलेले असून त्याच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे तर गुजरातच्या नागरिकात बाबा गुजरातला आल्यावर उत्साह दिसून येत आहे .

बागेश्वर बाबा म्हणाला की ,’ ज्या दिवशी गुजरातमध्ये आणि भारतात हिंदू लोक कपाळावर टिळा लावून रस्त्यावर उतरतील त्या दिवशी भारत हिंदू राष्ट्र होईल . फक्त भारतच नाही तर आपण हिंदू पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र बनवू. पाकव्याप्त काश्मीरला राम आणि हिंदुस्तानची गरज आहे. पाकिस्तान पीओकेला संभाळू शकत नाही.

सातत्याने असली विधाने करत राहणाऱ्या बागेश्वर बाबाला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे. इतरांच्या मनातील सांगणाऱ्या गोष्टी ओळखण्याचा दावा करणाऱ्या या बाबाने मी जंगलात तपस्या करत आहे. माझ्या विरोधात कारस्थाने चालू आहेत. सनातन विरोधी शक्ती यासाठी कार्यरत असल्याने मला सुरक्षा दिलेली आहे असा दावा केलेला असून भाजपशासित मध्यप्रदेश सरकारने ही सुरक्षा या बाबाला प्रदान केलेली आहे.


शेअर करा